गणेशोत्सवात मार्गदर्शक सूचनांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:00 AM2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:00:46+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.१८) गणेश उत्सव मंडळाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंोंदिया : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सुद्धा याचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला छोटे स्वरूप देऊन साधेपणाने साजरा करताना गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी पालन करावे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.१८) गणेश उत्सव मंडळाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी गणेश उत्सव साजरा करण्यासंदर्भात ११ जुलै रोजी गृह विभागाने निर्गमित केलेल्या परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. तसेच या परिपत्रकामध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन व अंमलबजावणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी यावेळी सूचना दिल्या.
याप्रसंगी गणेशोत्सव मंडळाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यांच्या प्रश्नांचे यावेळी समाधान करण्यात आले. घरगुती गणेश स्थापना करण्यास धातू व संगमरवरच्या मूर्ती किंवा घरी पूजा करण्यात आलेल्या गणेशाच्या मूर्तीचेच १० दिवस पूजन करून गणेश उत्सव साजरा करण्याबाबत सांगण्यात आले.
यावेळी सर्व नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी तसेच विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.