रोजगार गमावलेल्या मजुरांना अन्न धान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:28 AM2021-05-14T04:28:17+5:302021-05-14T04:28:17+5:30

आमगाव : काेरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचा रोजगार हिरावला आहे. परिणामी अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाच गरजवंत ...

Food aid to lost workers | रोजगार गमावलेल्या मजुरांना अन्न धान्याची मदत

रोजगार गमावलेल्या मजुरांना अन्न धान्याची मदत

Next

आमगाव : काेरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचा रोजगार हिरावला आहे. परिणामी अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाच गरजवंत मजुरांना अन्नधान्याची मदत करीत मयुर कोठारी यांनी मदतीचा हात दिला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. हाताला काम नाही, कोणतीही मिळकत नाही, अन्न धान्याची मदत नाही, स्थलांतरीत असल्याने शासनाची मदत नाही, अशी अनेक कुटुंब नागरी वस्तीला लागून असलेल्या विरळ भागात वास्तव्यास आहेत. रोजगारासाठी वारंवार स्तलांतरण करावे लागत असल्यामुळे खुल्या आभाळाखालील पडक्या छतामधील त्यांचे वास्तव्य असते. मयुर कोठारीसारख्या युवकाने सामाजिक बांधिलकी बाळगून सहकार्याने या कामगार मजुरांकरिता अन्न धान्याची मदत केली.

....

शासनाने मदत करावी

आमगाव तालुक्यातील विविध भागात असलेली स्थलांतरीत कुटुंब अन्नधान्याअभावी मदतीची प्रतीक्षा करीत आहेत. सामाजिक कार्यकर्ते काही मदत करीत आहेत. त्यामुळे तेच त्यांच्यासाठी मायबाप ठरत आहेत. पण, शासनाने ही मदत करावी, अशी अपेक्षा लोकवस्तीतील कुटुंबीयांनी केली आहे.

Web Title: Food aid to lost workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.