३२ कुटुंबातील अनाथ बालकांना अन्नधान्याची मदत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:01+5:302021-06-26T04:21:01+5:30
बोंडगावदेवी : जन्मदात्या आई- वडिलांचे छत्र हिरावलेले बालक स्वत:च्या संसाररुपी जीवनाचा भार उचलत आहेत. अशा अनाथ मुलांची जन्मदात्यांची उणीव ...
बोंडगावदेवी : जन्मदात्या आई- वडिलांचे छत्र हिरावलेले बालक स्वत:च्या संसाररुपी जीवनाचा भार उचलत आहेत. अशा अनाथ मुलांची जन्मदात्यांची उणीव भरता येत नसली तरी, त्यांना त्याची जाणीव होऊ न देता त्यांना आपले पाठीराखे आपल्या सोबत आहेत. त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करुन त्या अनाथांच्या पाठीशी पालकत्वाची साथ राहावी याच उद्देशाने समाजशील शिक्षक अनिल मेश्राम आपल्या सामाजिक दायित्व जपणाऱ्या सहकाऱ्यांच्या सहयोगाने मागील वर्षापासून अन्नधान्यासह जीवनोपयोगी वस्तू ,रोख रक्कम देण्याचा उपक्रम राबवित आहेत.
जिल्ह्यातील ठिकठिकाणाहून ३२ कुटुंबातील अनाथ मुुला-मुलींना सौंदड येथे आणण्यात आले. अनिल मेश्राम यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातून जमलेल्या अनाथ मुलांना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. प्रा. सविता बेदरकर, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार उषा चौधरी, जगदिश लोहिया, माजी उपसभापती दामोधर नेवारे, मधुसूदन दोनोडे, सुखलाल मेश्राम, नायब तहसीलदार बी.टी.यावलकर, सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे, नीलिमा मेश्राम, अजित कांबळे, भगवान नंदागवळी, ए.बी.कडू, दिलीप राऊत, राजू वैश्य, लक्ष्मी अग्रवाल, रामचंद्र भेंडारकर, राजेंद्र मेश्राम उपस्थित होते. सर्वांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. त्यांच्या अडचणी उपस्थित दानदात्यांनी अवगत केल्या. मोठा धीर देऊन जन्मदात्यांची एक प्रकारे जोड दिली. जीवन जगताना त्यांना कोणती कमतरता जाणवणार नाही म्हणून अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कम, थोर पुरुषांचे चरित्र प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
.............
शिक्षणामुळेच परिस्थितीवर मात करता येईल
स्वत:ला अनाथ समजू नका, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, काही झाले तरी विपरीत परिस्थिती समोर आली तरी सुध्दा शिक्षणात खंड पडू देऊ नका. शिक्षणच तुमचे भाग्य ठरविणार आहे. परिस्थितीशी संघर्ष करण्याची क्षमता ठेवा, मनात मोठे ध्येय ठेवा. जन्मदात्यांचे छत्र काळाने हिरावून घेतले असले तरी आमचा मायरुपी हात तुमच्या सोबत आहे, असा हितोपदेश करुन उपस्थितांनी पालकत्वाची जोड दिली.
.......
अनेकांनी उचलला खारीचा वाटा
जिल्ह्यातील ३२ अनाथ मुलांना मदतीचा हात देऊन जन्मदात्यांची उब देण्यासाठी अनेकांनी स्वेच्छेने खारीचा वाटा उचलला. यात शिल्पा सोनाले, उषा चौधरी, जगदिश लोहिया, रमेश खंडेलवाल, डॉ. विवेक मेश्राम, पी.आर.कापडे, अमित कांबळे, राहुल मडावी, ललितकुमार अग्रवाल, उमराव वागधरे, बाबादास येरोला, संदीप मोदी, बलवीर राऊत, आर.एस.डोये, सुखदास मेश्राम, काळे, ए.बी.कडू, बी.टी.यावलकर, आत्माराम गहाणे, धनरुप उके, दामोधर नेवारे, संतोष जगणे, ठाकूर किराणा, हितेंद्र रंगारी, आर.व्ही.मेश्राम, जी. एस. कावळे, कमलेश चुऱ्हे, दिलीप राऊत, राजेंद्र अग्रवाल, गायत्री इरले, राजू वैश्य, हेमंत निमजे, टी.बी.सातकर यांचा समावेश आहे.