आधार क्रमांकानुसार धान्य वाटप १ जुलैपासून

By Admin | Published: June 21, 2017 01:08 AM2017-06-21T01:08:00+5:302017-06-21T01:08:00+5:30

सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरणाचे काम सुरु आहे. १ जुलैपासून आधार क्र मांकानुसार धान्य वाटप होणार आहे.

Food allocation till July 1 | आधार क्रमांकानुसार धान्य वाटप १ जुलैपासून

आधार क्रमांकानुसार धान्य वाटप १ जुलैपासून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरणाचे काम सुरु आहे. १ जुलैपासून आधार क्र मांकानुसार धान्य वाटप होणार आहे. केंद्र शासनाच्या अन्न मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना आधार क्र मांक संबंधित तहसील कार्यालयास ३० जून पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या शिधा पत्रिकाधारकांनी अद्याप आधार क्र मांक दिले नसतील त्यांनी तहसील कार्यालय पुरवठा विभाग अथवा आपल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे जमा करावे.
जे पात्र लाभार्थी विहीत मुदतीत आधार क्र मांक जमा करणार नाही त्यांना लाभ अनुज्ञेय होणार नाही. अशा पात्र शिधा पत्रिकाधारकांना पुढील प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच लाभ अनुज्ञेय होईल. शिधा पत्रिका, आधार नोंदणी केल्याची स्लीप किंवा आधार नोंदणी करण्यासाठी केलेल्या विहीत नमून्यातील विनंतीची प्रत व मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला वाहन चालक परवाना, राजपत्रीत अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या पत्रावर निर्गमित फोटो ओळखपत्र/फोटोयुक्त बँक पासबुक, पोस्ट विभागाकडून देण्यात आलेले निवास पत्ता असणारे कार्ड, किसान फोटो पासबुक,अन्य राज्य शासन/केंद्रशासीत प्रदेश प्रशासनाकडून विनिर्दिष्ट अन्य दस्तऐवज यापैकी कोणतेही एक कागदपत्र, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
 

Web Title: Food allocation till July 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.