त्या अनाथ भावडांना रोख रकमेसह धान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:23 AM2018-02-17T00:23:27+5:302018-02-17T00:23:48+5:30

ऐन खेळण्या-बाळगण्याचा वयात मायबापाचे कृपाछत्र हरवल्याने निरागस दोन भावंडे अनाथ झाली. पुढील आयुष्य कसे व्यतीत करायचे हा गंभीर प्रश्न उभा असताना गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ. सविता बेदरकर पुढे आल्या.

 Food Assistance with cash to the orphaned siblings | त्या अनाथ भावडांना रोख रकमेसह धान्याची मदत

त्या अनाथ भावडांना रोख रकमेसह धान्याची मदत

Next
ठळक मुद्देसविता बेदरकर यांचा पुढाकार : अनाथांना दिली मायेची ममता

ऑनलाईन लोकमत
बोंडगावदेवी : ऐन खेळण्या-बाळगण्याचा वयात मायबापाचे कृपाछत्र हरवल्याने निरागस दोन भावंडे अनाथ झाली. पुढील आयुष्य कसे व्यतीत करायचे हा गंभीर प्रश्न उभा असताना गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ. सविता बेदरकर पुढे आल्या. दोघा भावंडांना भेटून रोख रकमेसह धान्याची मदत करुन भावनिक आधार देत वात्सल्य व मायेची ममता दिली.
येथील उमेश जिवन गोंधळे (१६), अमित जीवन गोंधळे (११) हे दोघे भावंड आज अनाथ म्हणून जिवन जगत आहेत. ऐन बालपणात त्यांना जन्मदात्यापासून पोरके होण्याची वेळ आली. जन्मदाते माय-बाप काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थाने जग सोडून गेले. आपले माय-बाप एवढ्या लवकर आपल्याला सोडून जातील अशी पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. घरामध्ये अठराविश्वे दारिद्रयाची साथ. अशात पुढील आयुष्याची जडणघडण कशी होणार हा प्रश्न आज त्या दोन भावंडासमोर निर्माण झाला आहे. जन्मदात्यांनी खेळण्या बागडण्याच्या वयात एकाएकी साथ सोडून दिल्याने कृपाछत्र हिरावून गेले. बालवयात मायेची साथ राहणे गरजेचे असते. माय विना भिखारी कुणी नाही असे म्हटले जाते. ज्याच्या पाठीवरुन मायेची साथ गेली त्यालाच जन्मदाती मायेचे महत्व कळते म्हणतात. त्या दोघा भावांना कुणाचाही आधार नाही. अनाथाचे जीवन जगणारा उमेश हा इयत्ता १० वी तर अमित हा इयत्ता ५ वी मध्ये असून जि.प.हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत.
समाजातील प्रत्येक मानवाला स्वत:च्या कूटूंबाचा स्वार्थ असतो. परंतु सामाजिक जीवन जगत असताना इतरांच्या दु:खात सामील होऊन त्यांच्या मदतीला धावून जाताना जो आनंद मिळतो तो अविस्मरणीय व मौल्यवान असतो. परिसरातील अनाथ मुलांना मदतीसाठी सतत प्रयत्नशील असणारे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे यांनी ही बाब गोंदियाच्या प्रा.डा. सविता बेदरकर यांच्या लक्षात आणून देऊन मदतीची याचना केली. त्या दोन भावडांना मदत करण्यासाठी गुरूवारी (दि.१५) त्या येथे आल्या व दोघाही भावांची भेट घेऊन त्यांच्याशी हितगुज साधला. त्यांना मायेचा प्रेम देऊन आधार दिला. शिक्षणात खंड पडू देऊ नका असे सांगून सर्वत्तोपरी मदत करण्याचे त्यांनी अभिवचन दिले.
जि.प.हायस्कूल येथे रोख रक्कम तसेच अन्नधान्य व किराणा सामानाचे वाटप गावचे माजी सरपंच तथा माजी जि.प.सदस्य डॉ. शामकांत नेवारे, अर्जुनी-मोरगावचे सामाजिक कार्यकर्ते शाम चांडक, मुख्याध्यापक खंडाईत यांच्या उपस्थितीत प्रा.सविता बेदरकर यांनी त्या दोन भावंडाना मदतीचे वाटप केले. समाजातील दानदात्यांनी त्या दोन अनाथ भावंडांच्या चेहºयावर हास्य फुलविण्यासाठी पुढे यावे असे भोई समाजाचे साधु मेश्राम, नानु मेश्राम, युनाथ मेश्राम यांनी कळविले आहे.

Web Title:  Food Assistance with cash to the orphaned siblings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.