भटक्या गोपाळ समाजबांधवांना गावकऱ्यांची अन्नधान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:21+5:30

कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊनमुळे भटक्या जमातीच्या‘गोपाळ’ समाज बांधवावर दोन वेळच्या भोजनाची गंभीर समस्या निर्माण झाली. बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्या गोपाळ समाजाच्या ५ कुटुंबांना तांदूळ, जीवनावश्यक वस्तू तसेच समाजाशील शिक्षक प्रदीप ढवळे यांच्याकडून रोख मदत करून हातभार लावला.

Food help of villagers to the stray Gopal community | भटक्या गोपाळ समाजबांधवांना गावकऱ्यांची अन्नधान्याची मदत

भटक्या गोपाळ समाजबांधवांना गावकऱ्यांची अन्नधान्याची मदत

googlenewsNext
ठळक मुद्देबोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतचे दायित्व : भटक्या गोपाळ समाजाच्या मदतीसाठी पुढे या

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जवळच्या बोदरा-देऊळगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत देऊळगाव येथे भटक्या जमातीमधील ‘गोपाळ’ समाज मागील काही वर्षांपासून ५-६ कुटुंब कायमस्वरूपी वास्तव्याने राहत आहेत. गावोगावी बिºहाड नेऊन अंग मोहनतीचे खेळ दाखवून पोटाची खडगी भरतात. घरातील महिला भगिनी लहान मुलांसह गावा-गावात भिक्षा मागतात यावरच त्यांच्या घरची चूल पेटते. कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊनमुळे भटक्या जमातीच्या‘गोपाळ’ समाज बांधवावर दोन वेळच्या भोजनाची गंभीर समस्या निर्माण झाली. बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्या गोपाळ समाजाच्या ५ कुटुंबांना तांदूळ, जीवनावश्यक वस्तू तसेच समाजाशील शिक्षक प्रदीप ढवळे यांच्याकडून रोख मदत करून हातभार लावला.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील देऊळगाव-बोदरा येथे भटक्या जमातीचे गोपाळ समाजाचे शंकर राऊत, किशोर राऊत, अशोक राऊत,हिरामन नेवारे, दिलीप नेवारे यांच्या ५ कुटुंबात १९ लोक राहतात. आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी ही लोक आपल्या कुटुंबासह बाहेरी राज्यात जावून पोटाची खडगी भरतात. देऊळगावात कायम स्वरूपी वास्तव्याने असणारा गोपाळा समाज आजही गावात सकाळच्यावेळी भीक्षा मागून दारोदार फिरून मिळेल त्या भिक्षेनी भूक भागवितात. गावात मिळाले त्या कामावर पुरूष मंडळी जातात. मात्र महिला भगिनी दारोदार फिरून भिक्षा पात्रात मिळालेल्या अन्नधान्यावरच त्यांच्या घरची चूल पेटते.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानी गोपाळ समाजाला गावात भिक्षा मागण्यासाठी जाणे सुध्दा आता कठीण झाले आहे. अशा स्थितीत त्यांना मदत करण्यासाठी सरपंच शंकर उईके पुढे आले. ग्रामपंचायत, गावातील प्रतिष्ठित दानदात्यांच्या सहभागाने प्रत्येक कुटुंबाला २० किलो तांदूळ जीवनावश्यक वस्तु रोख स्वरुपात मदत दिली.
देऊळगावचे स्वस्त धान्य दुकानदार शामराव झोळे, बोदराचे भागवत झोळे या दोघांनी १०० किलो तांदूळ उपलब्ध करून दिले. अन्नधान्यासह जीवनोपयोगी वस्तुंचे वाटप करताना सरपंच शंकर उईके, उपसरपंच गजानन शहारे, ग्रामसेवक व्ही.आर.ढोक, सदस्य सुनील बनकर, दिनेश चौधरी, योगेश्वर झोळे, देवकाबाई खोटेले, अंगला वटी, जयवंता झोळे, रविना जांभुळकर, सुनिता कांबळे, पोलीस पाटील नचिकेत कापगते, शिक्षक प्रदीप ढवळे, पवन जांभुळकर, वैशाली राऊत, भुमिता शहारे उपस्थित होते.

गोपाळ समाजाला नाथाची गरज
दररोज गावोगावी फिरून भिक्षा मागणाऱ्या भटक्या जमातीच्या गोपाळ समाजबांधवाची चूल तुमच्या-आमच्या दिलेल्या मुठभर अन्नधान्यावरच पेटली जाते. सर्वत्र संचारबंदीत त्या ५ कुटुंबावर आघात होत आहे. त्यांना या स्थितीत मदतीसाठी आज ‘नाथा’ची गरज आहे. भिक्षा पात्रात आणणे व पानावर खाणारा हा गोपाळ समाज आजच्या परिस्थितीत भरडल्या जावू नये. यासाठी प्रशासनाने सुध्दा त्यांना मदत करण्याची गरज आहे.

Web Title: Food help of villagers to the stray Gopal community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.