उघड्यावरील खाद्यपदार्थांनी आरोग्याची ‘ऐसीतैसी’

By admin | Published: September 11, 2014 11:38 PM2014-09-11T23:38:29+5:302014-09-11T23:38:29+5:30

गरमागरम भजी, पाणीपुरी, भेळ, नुडल्स, मंचुरीअन यांच्यावर घोंघावत असलेल्या माशा. त्यांच्यावर ताव मारणारे खव्वय्ये, हे दृश्य आजघडीला सर्वत्र दिसून येत आहे. तरीसुद्धा त्याची कोणतीही

The food of 'open food' | उघड्यावरील खाद्यपदार्थांनी आरोग्याची ‘ऐसीतैसी’

उघड्यावरील खाद्यपदार्थांनी आरोग्याची ‘ऐसीतैसी’

Next

गोंदिया : गरमागरम भजी, पाणीपुरी, भेळ, नुडल्स, मंचुरीअन यांच्यावर घोंघावत असलेल्या माशा. त्यांच्यावर ताव मारणारे खव्वय्ये, हे दृश्य आजघडीला सर्वत्र दिसून येत आहे. तरीसुद्धा त्याची कोणतीही पर्वा न करता पोटपुजा करताना दिसतात. पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे नानाविध आजारांना आमंत्रण मिळत असते. असे असतानाही खाण्याचा मोह आवरता येत नाही. आजारांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे.
वैद्यकीय सुत्रानुसार ७० टक्के पोटाचे आजार हे उघड्यावरील अन्न खाल्लयाने हात असतात. यावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. दुसरीकडे उघड्यावर खाद्यान्न विकणाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात न आल्याने हा प्रकार सर्रास सुरू आहे. बदलत्या जिवनशैलीमुळे खाण्याच्या पद्धतीही बदलल्या. आज ठिकठिकाणी खानावळी, हॉटेल्स, रेस्टॉरेंट थाटण्यात आलेली आहेत.
पाश्चात्य देशांमध्ये प्रसिद्ध असलेले विविध पदार्थही मेजवाणीसाठी तयार असतात. चिभेची चव बदलण्यासाठी प्रत्येक कुटूंब या पदार्थांचा आस्वाद घेत असतात. परंतु, आपण जे खात आहोत ते कितपत योग्य आहे, याची माहिती कुणालाही नसते.
जिल्ह्यात खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी अन्न सुरक्षा मानक कायद्यातील निकषांचा विचार करावयास पाहिजे. परंतु, जिल्ह्यात या कायद्याचा कुणीही विचार करीत नाही. हे सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.
मागीलवर्षी अन्न व औषधी विभागाच्या नागपूर येथील चमूने जिल्ह्याचा दौरा करुन हॉटेल्स, खानावळी, रेस्टॉरेंटमधील पाहणी केली होती. त्यातील अनेक जणांकडे व्यवसाय करण्याचा परवाना नव्हता. तेव्हा त्यांच्याकडून परवाना तसेच दंड आकारण्यात आला होता. त्यानंतर ही मोहिम राबविण्यात आली नाही.
जिल्ह्यात मुख्य रस्त्यावर तसेच गर्दीच्या ठिकाणी खाद्यांनांचे दुकाने थाटण्यात आली आहेत. त्या दुकानांना परवाने आहेत किंवा नाही याची तसदी अन्न व औषधी विभागाने कधी घेतली नाही. शिवाय या दुकानांमध्ये वापरण्यात येणारे अन्न पदार्थ, पाणी यांची गुणवत्ता काय, याचाही विचार करण्यात आलेला नाही.
या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी नोंदणी व परवाने तयार करण्यावरच अधिक भर देत आहे. नियमाप्रमाणे अन्न पदार्थ व विक्र ीचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. त्याठिकाणी वापरण्यात येणारे पिण्याचे पाण्याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेतून तपासून घेण्यात यावे, ज्याठिकाणी खाद्यपदार्थांची विक्र ी असते त्या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी ठेवावे आदी निकष आहेत. परंतु, यापैकी एकाही निकषांची पुर्तता केली जात नाही. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असते. गोंदियात दरवर्षी पावसाळ्यात चिखलमय वातावरण असते. परंतू एफडीएकडून कधीही तपासणी होत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The food of 'open food'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.