‘त्या’ दोन अनाथ भावंडाना अन्नधान्याची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 01:09 AM2017-08-13T01:09:45+5:302017-08-13T01:12:04+5:30
दोन अथान भावडांचा मुद्दा लोकमतने लावून धरला. त्याचीच दखल घेत सामाजिका कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर यांच्या सहकार्याने निमगाव येथील अनाथ झालेल्या दोन भावंडाना अन्नधान्य, किराणा सामान आणि शालेय साहित्याचा पुरवठा घरपोच करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : दोन अथान भावडांचा मुद्दा लोकमतने लावून धरला. त्याचीच दखल घेत सामाजिका कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर यांच्या सहकार्याने निमगाव येथील अनाथ झालेल्या दोन भावंडाना अन्नधान्य, किराणा सामान आणि शालेय साहित्याचा पुरवठा घरपोच करण्यात आला.
निमगाव येथील रोशन गिरधारी कांबळे (१३) व आशीष कांबळे (११) हे दोघेही भाऊ जन्मदात्यांचे छत्र हिरावल्याने मागील दोन वर्षांपासून अनाथ होवून हलाखीचे जीवन जगत आहेत. त्या अनाथ भावंडाचे पालनपोषण सद्यस्थिती वयोवृद्ध आजी-आजोबा करीत आहेत. सामान्य कुटुंबातील असलेले दोघेही भाऊ शासनाच्या मदतीपासून वंचित होते.
निमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लहू नाकाडे यांनी ‘लोकमत’चे प्रतिनिधी अमरचंद ठवरे यांच्याकडे त्या अनाथ भावंडाची व्यथा मांडली. लोकमतच्या माध्यमातून त्या दोघा भावंडांना मदत मिळवून देण्याची विनंती केली होती. गरिबीमध्ये जीवन व्यथित करणारे रोशन व आशीष या अनाथ भावांना मदत करण्याचे आवाहन केले. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी त्या दोन भावांना मदतीचे आश्वासन दिले. तसेच लगेच या दोन भावडांना तांदूळ, गहू, तेल, किराणा सामान व शालेय साहित्य या दोन भावडांना त्यांच्या घरी जाऊन दिले.
गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत दोघेही भाऊ शिक्षण घेत आहेत. त्या ठिकाणी उपसरपंच तसेच सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलास गायकवाड यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते लहू नाकाडे, मुख्याध्यापक बाळकृष्ण ब्राम्हणकर यांच्या उपस्थितीत दोघाही भावांना अन्नधान्यासह इतर साहित्य सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षक सदानंद मेंढे, मनोहर हातझाडे, प्रल्हाद कापगते, माहेश्वर सूर्यवंशी, सुरेखा गिºहेपुंजे, विश्रांती भोयर, अमिता शेळके प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमतच्या पाठपुराव्यामुळेच मदत मिळाल्याचे सांगत त्या दोन्ही भावंड व गावकºयांनी आभार मानले. सामान्य कुटुंबातील अनाथ झालेल्या दोघा भावांच्या चेहºयावर हास्य फुलविण्यासाठी दानदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
शासनाने घ्यावी जबाबदारी
राज्याचे सामाजीक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे याच जिल्ह्याचे रहिवासी आहे. त्यांनी या दोन भावडांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेऊन शासनाकडून मदत मिळवून द्यावी. तसेच समाजातील दानदात्यांनी या अनाथ भावडांच्या पाठीशी उभे राहावे. अशी मागणी निमगाव येथील गावकºयांनी केली आहे.