विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा
By admin | Published: December 27, 2015 02:12 AM2015-12-27T02:12:22+5:302015-12-27T02:12:22+5:30
येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जवलच्या गायखुरी येथे श्रमदान करून वनराई बंधारा बांधला.
श्रमदानाचे महत्व : शिक्षकवृदांनीही लावला हातभार
वडेगाव : येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जवलच्या गायखुरी येथे श्रमदान करून वनराई बंधारा बांधला.
विद्यालयाचे प्राचार्य टी.टी. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली गायखुरी नाला येथे इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्थ्यांनी यासाठी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वप्निल रहांगडाले याच्या नेतृत्वात हे श्रमदानाचे काम केले. विद्यार्थ्यांना शिक्षक वाय.के. नागपुरे, भांगे, वानखडे, निपाने, मेश्राम, नागदेवे व इतर कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले.
विद्यार्थ्यांमध्ये श्रमदान आणि सेवाभाव जागृत होण्याच्या दृष्टीने हे काम विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने केले. जंगलात जाऊन प्रत्यक्ष हे श्रमदान केल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला. तसेच पाण्याचे महत्वही जाणून घेतले. (वार्ताहर)