वनविभागाचे वनांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:35+5:302021-04-04T04:29:35+5:30
बिरसी-फाटा : जिल्हा वनविभागाचे वनक्षेत्राकडे दुर्लक्ष झाले असून, यामुळेच वन्यप्राणी व वन धोक्यात आले आहे. याची चौकशी करून कारवाई ...
बिरसी-फाटा : जिल्हा वनविभागाचे वनक्षेत्राकडे दुर्लक्ष झाले असून, यामुळेच वन्यप्राणी व वन धोक्यात आले आहे. याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय पर्यावरण व किसान महासंघ जल, जमीन, जंगल व किसान बचाओ आंदोलनाने केली आहे. यासाठी संघटनेने खासदार सुनील मेंढे यांना निवेदन दिले आहे.
जिल्ह्यातील वनक्षेत्रात लोकांचा वावर वाढत असून, यात सहल, फिरणे व आनंदाच्या नावाखाली स्वयंपाक बनविणे, धाबे तयार करणे, डीजे वाजविणे, प्राण्यांना पाहण्याकरिता रात्रभर वाहनाने फिरणे, वाहनांचा मोठा आवाज करून प्राण्यांना इतरत्र पळवून लावणे, प्लास्टिक केरकचरा करणे आदींमुळे वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका आहे. वृक्ष कटाईचे प्रमाण वाढत असून, वृक्ष लागवड बंद आहे. अशात रोहयोअंतर्गत ‘झाडे लावा-झाडे जगवा’ ही योजना सतत ३ वर्षांसाठी सातत्याने राबवावी, अशी मागणी संघटनेने निवेदनातून केली आहे.