वनविभागाची जनजागरण रैली
By Admin | Published: July 1, 2016 01:49 AM2016-07-01T01:49:49+5:302016-07-01T01:49:49+5:30
१ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडींचा संदेश देत तालुक्यातील सर्व वन कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावण्याच्या निर्धार केला आहे.
वृक्षारोपणाचा संदेश : वनकर्मचाऱ्यांचे बाईकने तालुका भ्रमण
सालेकसा : १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडींचा संदेश देत तालुक्यातील सर्व वन कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावण्याच्या निर्धार केला आहे. यासाठी संपूर्ण तालुक्यात जनजागरण रैली काढत जनतेला वृक्षारोपणाचे महत्व पटवून देण्यासाठी थेट संपर्क करीत वृक्षारोपणाच्या महत्वा संबधीचे पत्रक वाटप केले जात आहे.
तालुक्याचे वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान यांच्या मार्गदर्शनात सालेकसा मुख्यालयातून रैलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. एका चारचाकी वाहनाला पर्यावरणाचे संदेश देणारे पोस्टर व बॅनरने सजवून तसेच दोन कोटी वृक्ष लागवडीचे होर्डीग लावून समोर ठेवण्यात आले. त्यामागे वन विभागाचे सर्व कर्मचारी मोटर सायकलीवर स्वार होऊन वृक्षारोपणाचे महत्व सांगणारे प्रतिक म्हणून टीशर्ट आणि टोप्या घालून रैलीत सामिल झाले. संपूर्ण तालुक्याच्या लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली.
रैलीसाठी आरएफओ एस.जी.अवगान यांच्या पुढाकारात क्षेत्र सहाय्यक सी.जी.मडावी, आर.एस.भगत, पी.एस.मेंढे, एस.बी.घुगे, टी.टी.साखरे, डी.ए.वैद्य, गोरे, वनरक्षक आर.बी.उके, डी.डी.कटरे, एल.पी.बिसेन, डी.ए.चुटे, एस.एस.रहांगडाले, आर.ओ.दसरिया, एफ.सी.शेंडे,एस.बी.भेलावे, एस.आर.सोनवाने, जी.एम.रहांगडाले, एस.जी.बुंदेले, एम.बी.शामकुवर, एस.बी.कटरे, डी.आर.रामटेके व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)