वणव्यामुळे हजारो हेक्टरमधील वनसंपती राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 05:00 AM2021-04-04T05:00:00+5:302021-04-04T05:00:19+5:30

जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक असून २८ तेंदूपत्ता युनिट आहे. तसेच या जंगलामध्ये मोहा वृक्षाचे प्रमाण देखील अधिक आहे. यंदा मागील दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत जंगलात लावलेल्या वणव्यामुळे हजारो हेक्टरमधील वनसंपदा जळून राख झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

Forest fires burn thousands of hectares of forest | वणव्यामुळे हजारो हेक्टरमधील वनसंपती राख

वणव्यामुळे हजारो हेक्टरमधील वनसंपती राख

googlenewsNext
ठळक मुद्देजंगलातील वणव्याच्या घटनांमध्ये वाढ : तीन वन विभागात समन्वयाचा अभाव

अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळ्याला सुरुवात होताच जंगलात वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. तेंदूपत्ता आणि मोहफुलाचे संकलन करण्यासाठी नागरिक जंगलामध्येआगी लावतात. मात्र याप्रकारामुळे मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होत असून याला प्रतिबंध लावण्यासाठी वन विभागाच्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे उघडकीस आली आहे. 
जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक असून २८ तेंदूपत्ता युनिट आहे. तसेच या जंगलामध्ये मोहा वृक्षाचे प्रमाण देखील अधिक आहे. यंदा मागील दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत जंगलात लावलेल्या वणव्यामुळे हजारो हेक्टरमधील वनसंपदा जळून राख झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यात संवेदनशील क्षेत्र समजल्या जाणाऱ्या नवेगावबांध- नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील बफर झोन आणि चिचगड, सालेकसा, तिरोडा, उत्तर देवरी, सडक अर्जुनी, गाेरेगाव, नवेगाव, गोठगाव या वनक्षेत्रात लागलेल्या आगीच्या घटनांमुळे हजारो हेक्टरमधील वनसंपत्तीचे नुकसान झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. तेंदूपत्ता संकलन आणि मोहफुले वेचण्यासाठी काही जण रात्रीच्यावेळीस जंगलात आग लावत असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. मात्र आगीमुळे मौल्यवान संपत्ती नष्ट होत आहे. याला प्रतिबंध लावण्यात वन, वन्यजीव आणि वनविकास महामंडळ हे तिन्ही विभाग समन्वयाअभावी अपयशी ठरत आहे. 

जिल्ह्यात दररोज वणव्याच्या ३५ घटना 
जंगलात लागणाऱ्या वणव्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी फाॅरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियातर्फे सॅटेलाईटच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. वणव्याची माहिती फायर वॉचर टीम आणि संबंधित वन विभागाला दिली जाते. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जंगलात वणवा लागण्याच्या दरराेज ३५ घटना घडत आहेत. 
वणवा नियंत्रणासाठी ५० फायर वॉचर टीम
उन्हाळ्याच्या दिवसात जंगलात वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी ५० फायर वाॅचर टीम गठित करण्यात आल्या आहे. एका टीमध्ये ३ सदस्यांचा समावेश आहे. वॉच टॉवर, सॅटेलाईट, वनरक्षक, वन मजूर यांचीसुध्दा मदत घेतली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी २६ फायर ब्लोअर सुध्दा या टीमला उपलब्ध करुन देण्यात आले. 
२ एप्रिलला ५० आगीच्या घटनांची नोंद 
तेंदूपत्ता आणि मोहफुल संकलनासाठी काही नागरिक जंगलामध्ये रात्रीच्या वेळेस आगी लावतात. शुक्रवारी (दि.२) जिल्ह्यातील जंगलामध्ये ५० ठिकाणी आग लागल्याची घटनांची नोंद झाल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. 

 

Web Title: Forest fires burn thousands of hectares of forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.