तालुक्यातील वनसंपदा ठरत आहे वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:27 AM2021-04-18T04:27:44+5:302021-04-18T04:27:44+5:30

आदिवासी समाजाचे आद्य दैवत असलेल्या या सशिकरण मंदिरात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने पूजाअर्चा करतात. दरवर्षी नवरात्रात पहिल्या सोमवारी ...

The forest resources of the taluka are becoming a boon | तालुक्यातील वनसंपदा ठरत आहे वरदान

तालुक्यातील वनसंपदा ठरत आहे वरदान

Next

आदिवासी समाजाचे आद्य दैवत असलेल्या या सशिकरण मंदिरात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने पूजाअर्चा करतात. दरवर्षी नवरात्रात पहिल्या सोमवारी मोठी यात्रा भरते. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्यांतील आदिवासी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. सडक अर्जुनी तालुक्यात पूर्व दिशेला उमरझरी माध्यम प्रकल्प आहे. या मध्यम प्रकल्पामुळे तालुक्यातील डोंगरगाव, खजरी, चिरचाडी, आदर्श कोहली टोला,परसोडी, कोदामेडी, बोथली आदी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय केली जात आहे. या मध्यम प्रकल्पामुळे परिसरातील पिण्याचे पाण्याची गरज पूर्ण होत आहे. विहिरींची पाण्याची पातळी उंचावली आहे. हा माध्यम प्रकल्प सडक अर्जुनी तालुक्यासाठी साठी वरदानच ठरला आहे. वन विभागाचे वनक्षेत्र लागून असल्यामुळे शेंडा, कोसमतोंडी, सौंदड, कोहमारा, डेपो, डोंगरगाव, रेंगेपार, कोकणा जमी परिसरात शेतकरी, शेतमजूर यांना उन्हाळ्याच्या दिवसात मोहफुले, डिंक मोठ्या प्रमाणात मिळते, त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना मोहफूल व्यवसाय झाल्याने, त्यांची आर्थिक समस्या सुटते, त्याचप्रमाणे तेंदूपत्ता हंगाम चांगला राहत असल्याने दोन पैसे कमविण्याची संधी उपलब्ध होते.

......

शेतकरी वळले जोड व्यवसायाकडे

तालुक्यात सिंदीपार, कोकणा, कोदामेडी, शेंडा, खडकी, बाह्मणी, सौंदड, तिडका, चिचटोला, कोसमतोंडी, डव्वा, म्हसवानी आदी परिसरातील मोठ्या प्रमाणात केळी, डाळिंब, संत्रा, उस, ॲपल बोर, भाजीपाला वेलवर्गीय उत्पादन काढून व्यवसाय केला जात आहे. त्यात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे तालुक्यातील वनसंपदा नागरिकांसाठी वरदान ठरत आहे.

Web Title: The forest resources of the taluka are becoming a boon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.