तीन महिन्यांपासून वनकर्मचारी वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:01+5:302021-07-10T04:21:01+5:30

सडकअर्जुनी : सडकअर्जुनी वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे वनरक्षक, वनपाल संघटना नागपूर शाखा-सडकअर्जुनी व ...

Forest workers without pay for three months | तीन महिन्यांपासून वनकर्मचारी वेतनाविना

तीन महिन्यांपासून वनकर्मचारी वेतनाविना

Next

सडकअर्जुनी : सडकअर्जुनी वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे वनरक्षक, वनपाल संघटना नागपूर शाखा-सडकअर्जुनी व वनकर्मचारी यांनी राजेश पाचभाई वनपरिक्षेत्राधिकारी यांना निवेदन देऊन वेतन मिळण्यास विलंब करणाऱ्या लिपिक व संगणक ऑपरेटरवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

वनकर्मचारी हे आपल्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता घनदाट, पहाडी व नक्षलक्षेत्रात काम करीत असतात. शासनाचे पाच तारखेपर्यंत वेतन करण्याचे परिपत्रक असूनसुद्धा वेतन वेळेवर दिले जात नाही. ही खूप गंभीर बाब असल्याची संघटना व वनकर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ३ महिन्यांच्या थकीत वेतनाकरिता बाबू व संगणक ऑपरेटर जबाबदार असून निवेदनाद्वारे कार्यवाहीची मागणी संघटना व वनकर्मचारी यांच्याकडून करण्यात आली आहे. मासिक वेतन न झाल्याने घर, वाहन, वैयक्तिक व इतर कर्जाची रक्कम वेळेवर भरता येत नाही. त्याकरिता बँकेकडून दंड आकारला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे सिबिल स्कोर बिघडल्याने बँक कर्ज देत नाही. वनकर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत असताना कोरोनाकाळात पाॅझिटिव्ह झाले होते.

कुठलीही भीती न बाळगता वनसंरक्षण व इतर कामे वनकर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली. तरीसुद्धा कार्यालयात काम करणारे लिपिक व संगणक ऑपरेटर यांनी विविध कारणे देत वेतन काढले नाही. ३ महिन्यांच्या थकीत वेतनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष असून याचा परिणाम शासकीय कामावर होण्याची दाट शक्यता आहे. थकीत वेतन वेळेवर न काढल्यास व लिपिक, संगणक ऑपरेटर यांच्यावर कार्यवाही न झाल्यास संघटना व वनकर्मचारी यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिष्टमंडळात नरेश पातोडे, संजय चव्हाण, दिलीप माहुरे, शैलेश पारधी, वनरक्षक शिवशंकर बघेले, कोमल हत्तीमारे, संजुशा पटले, दिगांबर मुंगुलमारे उपस्थित होते.

Web Title: Forest workers without pay for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.