रेल्वे प्रवासात दो गज की दुरी व मास्क जरुरीचा विसर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:11+5:302021-06-09T04:37:11+5:30
आमगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवासी रेल्वे गाडी पूर्णत: बंद केली होती. कालांतराने प्रवासी वाहतूक सेवा ...
आमगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवासी रेल्वे गाडी पूर्णत: बंद केली होती. कालांतराने प्रवासी वाहतूक सेवा कोविड नियमावली ठरवून काही रेल्वे गाड्यांना प्रारंभ करण्यात आला. पण प्रवासी नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणेने अनेक उपाययोजना केल्या. परंतु शासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागले. त्यातच आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगण्याची गरज आहे. रेल्वे विभागाने प्रवासी वाहतूक हळूहळू पूर्ववत सुरू केली आहे. नियम पाळूनच सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू करून काही प्रवासी गाड्या सुरू केल्या. हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या काही मोजक्या प्रवासी लोकल, सुपरफास्ट प्रवासी
गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांमध्ये प्रवासात प्रवाशांनी कोविडची भीतीच बाजूला सारून बिनधास्तपणे प्रवास सुरू केला आहे. विनामास्क व सामाजिक अंतर टाळून गर्दी करणे सुरू केली आहे. त्यामुळे हा प्रवास आता धोक्याचा ठरत आहेत. प्रवासात कोणतेही सामाजिक अंतर कमी न करता विनामास्क आरोग्याला आव्हान देत प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेले नियमच प्रवाशांनी घालवले, असे चित्र दिसत आहे.
रेल्वेत प्रवाशांना कोविड नियंत्रणासाठी कायदा लागू करण्यात आला आहे की नाही, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. विनामास्क व सामाजिक अंतर याला डावलून सर्रास प्रवास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासामुळे कोविडचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.