भाजपला आश्वासनांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:11 AM2017-09-25T00:11:08+5:302017-09-25T00:11:42+5:30

तालुक्यासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाने नेहमी शेतकºयांचा आवाज उचलण्याचे काम केले आहे.

Forget the assurances of BJP | भाजपला आश्वासनांचा विसर

भाजपला आश्वासनांचा विसर

Next
ठळक मुद्देसहषराम कोरोटे : काँग्रेस कमिटीतर्फे सभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाने नेहमी शेतकºयांचा आवाज उचलण्याचे काम केले आहे. भाजपने केंद्र व राज्यात सत्तेत येण्यासाठी शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना मोठे आश्वासन देऊन सहानुभूती दाखविली. आज सत्तेवर आल्यानंतर े दिलेले आश्वासन विसरत केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर महागाई वाढवून सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.
तालुका काँग्रेस कमिटीद्वारे कोरोटे यांच्या निवासस्थानी ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात आयोजित सभेत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. सदर सभा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे, गोंदिया जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्य उषा शहारे, जि.प. सदस्य माधुरी कुंभरे, देवरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटीया, नगर पंचायतचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, माजी सभापती वसंत पुराम, तालुका महासचिव बळीराम कोटवार, माजी पं.स. सदस्य सोनू नेताम, विधानसभेचे युवक काँग्रेस अध्यक्ष नरेश राऊत, अविनाश टेंभरे, बबलू कुरैशी, संदीप मोहबीया, गणेश भेलावे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ता महिला, पुरुष व युवक उपस्थित होते.
पुढे बोलताना कोरोटे यांनी, केंद्रात काँग्रेसची सरकार असताना घरगुती गॅस सिलेंडरचे दर ३८२ रुपये करायला ४० वर्षे लागले. परंतु विद्यमान भाजप सरकारने ४० महिन्यांतच ७८४ रुपये केले. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त गावाची घोषणा केली. मात्र त्या गावातील शेतकºयांना मदत राशी अद्याप मिळाली नाही. सुशिक्षित बेरोजगार युवकांकरिता रोजगाराची सोय नाही. सरकारच्या अपयशांना सर्व जनतेसमोर उपस्थित करुन विकासाच्या नावावर ग्रा.पं.च्या सरपंच व सदस्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा जोरदार प्रचार करुन तालुक्यातील २५ ग्रा.पं.च्या निवडणुकीत काँग्रेसचाच झेंडा फडकावा कारण येणारा काळ हा काँग्रेस पक्षाचाच आहे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी कटरे यांनी, सर्वसामान्य जनतेत विद्यमान भाजप सरकारच्या प्रती नाराजीचे वातावरण आहे. पेट्रोल व डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती व कृषी उत्पादनात समर्थन दरात कपात या सारखे अनेक मुद्दांनी केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरली आहे. येत्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोराने प्रचार करावा असे मत व्यक्त केले.
जिल्हा महिला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शहारे यांनी, काँग्रेस सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण देवून राजकारणात पुरुषांसोबत बरोबरीचा दर्जा दिला. तर भाजप सरकारने दैनंदिन व्यवहारातील उपयोगात येणाºया वस्तुंचे भाव वाढवून महिलांच्या विश्वासाला आघात पोहोचविला आहे. त्यांचे प्रत्युत्तर येत्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत महिला देणार असल्याचे मत व्यक्त केले.
या सभेदरम्यान काँग्रेस पक्षाच्या विचार धारेशी प्रभावित होवून भाजप पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे पुराडाचे प्रभू उईके, अशोक शेंडे आणि चिचेवाडाचे महेंद्र कोवाची व देवराज भोयर यांचा पक्षाचा शेला व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संदीप भाटीया यांनी मांडले. संचालन युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नरेश राऊत यांनी केले. आभार माजी सभापती वसंत पुराम यांनी मानले. दरम्यान निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली.

Web Title: Forget the assurances of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.