डॉक्टरकडे २० हजारांची खंडणी मागणाऱ्या चार गुंडाना केली अटक

By नरेश रहिले | Published: February 9, 2024 06:23 PM2024-02-09T18:23:42+5:302024-02-09T18:24:31+5:30

गोंदिया: शहराच्या कृष्णपुरावॉर्डातील डॉ.लोकेश चर्तुभुज मोहणे(४३) यांना २० हजाराची खंडणी मागत त्यांची मोटारसायकल जाळणाऱ्या चार आरोपींना गोंदिया शहर पोलिसांनी ...

Four gangsters who demanded ransom of 20,000 from the doctor were arrested | डॉक्टरकडे २० हजारांची खंडणी मागणाऱ्या चार गुंडाना केली अटक

डॉक्टरकडे २० हजारांची खंडणी मागणाऱ्या चार गुंडाना केली अटक

गोंदिया: शहराच्या कृष्णपुरावॉर्डातील डॉ.लोकेश चर्तुभुज मोहणे(४३) यांना २० हजाराची खंडणी मागत त्यांची मोटारसायकल जाळणाऱ्या चार आरोपींना गोंदिया शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासात अटक केली आहे. ही कारवाई ८ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.

गोंदियाच्या कृष्णपुरावॉर्डातील डॉ.लोकेश चर्तुभुज मोहणे यांना आरोपी राज ऊर्फ मारी सुशिल जोसेफ (२०), मुकेश ऊर्फ डाव विनोद तांडेकर (३०), सुशांत रतन जाधव (३४), धर्मराज ऊर्फ धर्मा दादी बावणकर (३२) रा. गौतमनगर, गोंदिया यांनी ६ फेब्रुवारी २०२४ रोजी २० हजार रुपये खंडणीची मागणी केली. डॉ. लोकेश मोहणे यांनी २० हजार रूपये खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी त्यांच्या जवळील मोटार सायकल जबरदस्तीने हिसकावुन नेली. त्या मोटार सायकलला आग लावुन पेटवून दिले. गोंदिया शहर पोलिसांनी चौघां आरोपींवर भादंविच्या कलम ३८४, ४३५, ३४ अन्वये ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. त्या आरोपींना ९ फेब्रुवारी रोजी अटक केली.

तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम करीत आहेत. आरोपींना मुख्य न्यायालय, गोंदिया येथे हजर केले असता न्यायालयाने २२ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृह भंडारा येथे रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीनी बानकर यांच्या निर्देशान्वये शहर ठाण्याचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी. पथकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, सहाय्यक फौजदार घनश्याम थेर, पोलीस हवालदार. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपालसिंह भाटीया, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, संतोष भेंडारकर, महिला पोलीस हवालदार रिना चौव्हाण, पोलीस शिपाई अशोक रहांगडाले, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केली आहे.

Web Title: Four gangsters who demanded ransom of 20,000 from the doctor were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.