साडेचार एकरातील उभे धानपीक जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 09:56 PM2017-11-13T21:56:45+5:302017-11-13T21:56:57+5:30
यंदा पावसाने पाठ फिरविल्याने रोवणी लांबली होती. त्यातच धानपीक ऐन कापणीच्या हंगामात असताना त्यावर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने धानाची पूर्णत: तणस झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : यंदा पावसाने पाठ फिरविल्याने रोवणी लांबली होती. त्यातच धानपीक ऐन कापणीच्या हंगामात असताना त्यावर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने धानाची पूर्णत: तणस झाली आहे. धानपिकांवरील कीडरोगांनी त्रस्त झालेल्या दोन शेतकºयांनी साडेचार एकरातील उभे धानाचे पीक जाळले. ही घटना रविवारी (दि.१२) तालुक्यातील धानोली येथे घडली. या घटनेमुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दुर्योधन मनीराम गौतम व जयराम शिवशंकर कटरे, रा.धानोली अशी कीडरोग आणि नैसर्गिक संकटांना कंटाळून शेतातील धान पिकाला आग लावणाºया शेतकºयांची नावे आहेत. दुर्योधन गौतम यांनी अडीच एकरातील तर जयराम कटरे यांनी दोन एकरमधील धानपीक जाळून टाकले. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने बºयाच शेतकºयांना रोवणी करता आली नाही. तर काही शेतकºयांनी उपलब्ध सिंचनाच्या सोयीच्या मदतीने कशी बशी रोवणी आटोपली. मात्र कीडरोगांमुळे हाती आलेले पीक गमविण्याची वेळ शेतकºयांवर आली. त्यामुळे शेतकरी नैराश्यात आहे. हजारो रुपयांचा लागवड खर्च करुनही काहीच हाती लागण्याची शक्यता कमी आहे. यामुळेच या दोन शेतकºयांनी शेतातील उभे धानपीक जाळल्याचे बोलल्या जाते. ही केवळ या दोन शेतकºयांची व्यथा नसून तालुक्यातील अनेक शेतकºयांची हीच स्थिती आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी, धानोली, बोळुंदा, थाडेझरी, बेहळीटोला या गावातील शेतकºयांनी ५० टक्के धानाची रोवणी केली नाही. केवळ ज्यांच्याकडे सिंचनाची सोय होती. अशाच शेतकºयांनी इतर शेतकºयांना मदत करुन धानाची लागवड केली.
पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या
धानोरी येथील ७०० एकर शेतीपैकी केवळ १२५ एकरवर धानाची लागवड करण्यात आली. थाडेझरी येथील २५० एकर शेतजमीन असून केवळ १० एकरात धानपिकाची लागवड करण्यात आली. शेतकºयांनी काढलेल्या पीक विम्याचाही फायदा शेतकºयांना मिळाला नाही. तसेच नुकसान भरपाई देखील मिळाली नाही. प्रशासनाने पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.