विहिरीतील मोटारपंप काढण्यासाठी गेलेल्या चार जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By अंकुश गुंडावार | Published: June 28, 2023 11:30 AM2023-06-28T11:30:51+5:302023-06-28T11:31:37+5:30
तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील घटना : एकाच कुटुंबातील दोघांचा समावेश
तिरोडा (गोंदिया) : घरासमोरील विहिरीतील बंद पडलेला मोटारपंप दुरुस्तीसाठी बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या चार जणांचा विद्युत धक्का लागून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे घडली. खेमराज साठवणे, सचिन भोंगाडे, प्रकाश भोंगाडे, महेंद्र राऊत असे विद्युत धक्का लागून मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार सरांडी येथील खेमराज साठवणे यांच्या घरगुती विहिरीतील मोटार पंप खराब झाला. तो दुरुस्त करण्याकरिता खेमराज साठवणे हे आधी विहिरीत उतरले. परंतु बराच वेळ होऊन सुद्धा ते बाहेर आले नाही म्हणून सचिन भोंगाडे खाली उतरले. पण ते सुद्धा परत बाहेर आले नाही म्हणून त्यांना वाचविण्याकरता प्रकाश भोंगाडे व महेंद्र राऊत देखील विहिरीत उतरले असता त्यांना विद्युत धक्का लागून त्या दोघांचाही मृत्यू झाला.
नाल्याच्या पुरात वाहून गेलेला अज्ञात व्यक्ती झरपडा गावचा
दरम्यान या घटनेचीे माहिती गावकऱ्यांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच मदत कार्याला सुरुवात केली. तसेच याची माहिती पोलिस स्टेशन व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. या घटनेमुळे सरांडी गावात शोककळा पसरली आहे.