तालुक्यात एकाचदिवशी चार विषारी सापांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:20 AM2021-07-21T04:20:43+5:302021-07-21T04:20:43+5:30
पहिल्या घटनेत सकाळी १०.३० वाजता बोरी-बोलदेचे पोलीसपाटील ठाकरे यांच्या धाब्यावर साप असल्याची माहिती सर्पमित्र राहुल लाडे व मुकेश पवार ...
पहिल्या घटनेत सकाळी १०.३० वाजता बोरी-बोलदेचे पोलीसपाटील ठाकरे यांच्या धाब्यावर साप असल्याची माहिती सर्पमित्र राहुल लाडे व मुकेश पवार यांना मिळाली. त्यांनी सापाला ताब्यात घेतले असता, तो ५.५ फूट लांबीचा, नाग प्रजातीचा होता. दुसऱ्या घटनेत ग्राम कोरंभीटोला येथील ओमप्रकाश दाने यांच्या घरात साप दबा धरून होता. सर्पमित्रांनी त्या १.५ फूट लांबीच्या नागाला पकडले. दोन्ही सापांना सोनेगाव जंगल परिसरात दुपारी १२.३० सोडण्यात आले. यावेळी सर्पमित्र लाडे, पवार, गिरधारी शेंडे, महादेव ठाकरे उपस्थित होते.
तर त्यानंतर तिसऱ्या घटनेत अर्जुनी येथील पोलीस ठाण्यात सायंकाळी ८ च्यादरम्यान साप आढळून आला. सर्पमित्रांनी सापाला ताब्यात घेतले असता, तो धामण प्रजातीचा, ४ फूट लांबीचा होता. त्याला सुकडी जंगल शिवारात सोडण्यात आले. तसेच चवथ्या घटनेत शहरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात रात्री ९ च्यादरम्यान आढळलेल्या ३ फुटाच्या मण्यार सापाला पकडून सुकडी जंगल शिवारात सोडून जीवदान देण्यात आले.