जिल्ह्यातील चार योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:03 PM2017-12-18T23:03:43+5:302017-12-18T23:04:05+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी प्रत्येक गावाला त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिली जात आहे.
कपिल केकत।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी प्रत्येक गावाला त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिली जात आहे. या योजनांतून गाव आपली तहान भागवित असून या योजना गावकऱ्यांसाठी वरदान ठरतात. असे असताना मात्र जिल्ह्यातील चार योजना बंद असल्याची माहिती आहे. लवकरच या योजना सुरू न झाल्यास येणाºया काळात या गावांत पाणी पेटणार असल्याची चिन्हे दिसून येत असून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे येणाऱ्या काळात पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहेत. अशात ग्रामीण भागात पाणी पेट घेऊन ग्रामीणांची पाण्यासाठी भटकंती होते. पाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची भटकंती होऊ नये यासाठी शासनाकडून प्रत्येकच गावाला त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिली जात आहे. या योजनेतून त्या गावाला पाणी पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबत आहे.
जिल्ह्यात आजघडीला ३२१ पाणी पुरवठा योजना असून यांच्या माध्यमातून गावांना पाणी पुरवठा होतो. शिवाय गरजेनुसार अन्य काही योजनांचे काम सुरू आहे. या पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी मिळत असल्यामुळे गावकºयांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ येत नाही.
योजनांत काही बिघाड आल्यास किंवा काही अन्य कारणांमुळे योजना बंद पडल्यास गावात हडकंप माजतो. पाणी न मिळाल्यास गावकºयांना पाण्यासाठी अन्य साधनांवर अवलंबून रहावे लागते. मात्र उन्हाळ््यात अन्य साधनांनीही साथ सोडल्यास पाणी पेट घेऊन त्या गावांत हाहाकार माजतो.
आता दोन महिन्यांवर उन्हाळा आला असून यंदा उन्हाळ््यात पाणी टंचाईची पूर्ण चिन्हे दिसून येत आहेत. असे असताना मात्र, जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील ग्राम देवरी, सालेकसा तालुक्यातील ग्राम कावराबांध, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम गौरनगर व कोरंभीटोला येथील पाणी पुरवठा योजना बंद पडून आहे. यंदा आतापासूनच नदी, नाले व तलावांत ठणठणाट असताना भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावत चालली आहे. अशात उन्हाळ््यात या चार गावांत पाणी पेटणार यात मात्र शंका वाटत नाही.
देखभाल-दुरूस्तीचा अभाव
जिल्ह्यातील ९ योजनांना वीज जोडणी न मिळाल्यामुळे त्या बंद पडून आहेत. मात्र देवरी, कावराबांध, गौरनगर व कोरंभीटोला येथील या योजनांना देखभाल-दुरूस्तीतील अभावाचा फटका बसला असल्याची माहिती आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजना तयार झाल्यानंतर ग्रामपंचायतला हस्तांतरीत केली जाते. त्यानंतर संबंधीत ग्रामपंचायतला योजनेची देखभाल-दुरूस्ती करावी लागते. यासाठी पाणीपट्टी गोळा करून योजनेसाठी येणारे खर्च करावे लागतात. मात्र बहुतांश वेळी विजेचे बील न भरण्याचे प्रकार पुढे येतात. शिवाय अन्य काही कारणांमुळेही योजना बंद पडतात. या चार योजनांनाही यातीलच काही प्रकारांचा फटका बसला आहे.