दोन शाळांत चार विद्यार्थी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:27 AM2021-03-21T04:27:59+5:302021-03-21T04:27:59+5:30

अर्जुनी मोरगाव : शाळाशाळांत कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या होऊ लागताच आता विद्यार्थी पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. तालुक्यातील दोन शाळांतील चार ...

Four students in two schools tested positive | दोन शाळांत चार विद्यार्थी पॉझिटिव्ह

दोन शाळांत चार विद्यार्थी पॉझिटिव्ह

Next

अर्जुनी मोरगाव : शाळाशाळांत कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या होऊ लागताच आता विद्यार्थी पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. तालुक्यातील दोन शाळांतील चार विद्यार्थी पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. यामुळे पालकवर्ग चिंतित आहे.

गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत शाळा सुरू होत्या. दरम्यान जिल्हा प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश दिले होते. अनेक शाळांत चाचण्या होऊ लागल्या. यात काही विद्यार्थी पॉझिटिव्ह आले. ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी काढले. त्यानुसार शनिवारपासून शाळा बंद झाल्या. मात्र विद्यार्थ्यांच्या चाचण्या सुरूच आहेत. शनिवारी आरटीपीसीआर तपासणी किट उपलब्ध नसल्याने चाचण्या होऊ शकल्या नाहीत. मात्र तत्पूर्वी दोन शाळांत चार विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. किटअभावी अनेक शाळांतील विद्यार्थ्यांच्या अद्याप चाचण्या पूर्ण झाल्या नाहीत. आणखी यात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेत असले तरी अद्याप महाविद्यालय व खासगी शिकवणी वर्ग सुरूच आहेत. काही शिक्षक स्वतःच्या घरी शिकवणी वर्ग चालवित असल्याचे समजते. अशा गैरप्रकारांतून छुप्या पद्धतीने कोरोनाच्या संसर्गवाढीला आमंत्रण दिले जात आहे. खुल्या शिकवणी वर्गांऐवजी ऑनलाइन शिकवणी वर्ग हा यावर पर्याय उपलब्ध असताना शिक्षक गैरमार्गाचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Four students in two schools tested positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.