नदीपात्रातून रेती काढणारे चार ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:32 PM2019-01-02T21:32:46+5:302019-01-02T21:33:23+5:30

तालुक्यात बिरोली शिवारातील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पहाटे ३ वाजता जावून तहसीलदार संजय रामटेके यांनी कारवाई करीत ट्रॅक्टर सहित रेती पकडली.

Four tractors that took off the river from the river bed | नदीपात्रातून रेती काढणारे चार ट्रॅक्टर पकडले

नदीपात्रातून रेती काढणारे चार ट्रॅक्टर पकडले

Next
ठळक मुद्देतहसीलदारांची धाडसी कारवाई : पहाटे नदीपात्रात जावून दिला दणका

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तालुक्यात बिरोली शिवारातील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पहाटे ३ वाजता जावून तहसीलदार संजय रामटेके यांनी कारवाई करीत ट्रॅक्टर सहित रेती पकडली. २८ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत तहसीलदार रामटेके यांनी चार ट्रॅक्टर पकडले.
नदीपात्रातून रेतीची चोरी होत असल्याची माहिती मिळत असल्याने तहसीलदार रामटेके यांनी २८ डिसंबर रोजी पहाटे बिरोली येथील नदीपात्र गाठले.
तेथे त्यांनी तीन ट्रॅ्क्टर पकडले. मात्र चंद्रकुमार अंबर सोनेवाने हा ट्रॅक्टर घेऊन तेथून पसार झाला. यावर तहसीलदार रामटेके यांनी, बिरोली गावात जावून कारवाई केली. मात्र चंद्रकुमार व त्यांचा मुलगा शुभम याने तहसीलदार रामटेके यांना शिवीगाळ केली.
विशेष म्हणजे, शुभम सोनेवाने यांची आई पोलीस पाटील असून आपल्या पती व मुलास समजावण्याचा प्रयत्न न करता प्रोत्साहन दिले.
यावर तहसीलदार रामटेके यांनी पोलिसात तक्रार दिली.
कारवाई करण्यात आलेल्या चार ट्रॅक्टर पैकी तीन ट्रॅक्टर मालकांनी गुन्हा कबूल करून आपले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावले आहे. तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चंद्रकुमार अंबर सोनेवाने, शुभम चंद्रकुमार सोनेवाने व पुष्पा चंद्रकुमार सोनेवाने यांच्यावर कलम ३५३, ३९२, २९४, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद केली.
 

Web Title: Four tractors that took off the river from the river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.