रेल्वे स्थानकावर लागणार चार वॉटर वेंडिंग मशीन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 09:17 PM2018-07-29T21:17:28+5:302018-07-29T21:17:54+5:30

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन लावून प्रवाशांसाठी शुद्ध व शीतल जल उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यात नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे स्थानकावर चार वॉटर वेंडिंग मशीन्स लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Four water vending machines that will be required at the railway station | रेल्वे स्थानकावर लागणार चार वॉटर वेंडिंग मशीन्स

रेल्वे स्थानकावर लागणार चार वॉटर वेंडिंग मशीन्स

Next
ठळक मुद्दे१२ स्थानकांत लागल्या ३३ मशिन्स : दपूमच्या सहा स्थानकांत लागणार नऊ मशीन्स

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन लावून प्रवाशांसाठी शुद्ध व शीतल जल उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यात नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे स्थानकावर चार वॉटर वेंडिंग मशीन्स लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
प्रवासादरम्यान प्रवासी रेल्वे स्थानकावरील नळांचे पाणी भरून आपली तहान भागवितात. यात मोठ्यांपासून चिमुकल्यांनाही तेच पाणी दिले जाते. कित्येक ठिकाणचे पाणी पिण्या योग्य असते किंवा नसते. शिवाय गाड्यांत जास्तीचे दर आकारून पाण्याची बाटल विकली जाते. श्रीमंतांना पाण्याची बाटल खरेदी करणे परवडते. मात्र गरिबांना रेल्वे स्थानकावरून पाणी भरणे हाच उपाय असतो. अशात पाण्यामुळे तब्येत बिघडण्याचे प्रकारही घडतात. यावर तोडगा म्हणून रेल्वेने रेल्वे स्थानकांवर शुद्ध पाण्याच्या व्यवस्थेसाठी हा प्रयोग अंमलात आणला आहे.
सध्या दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या १२ स्थानकांवर एकूण ३३ मशीन लावण्यात आल्या आहेत. यात बिलासपूर, रायगड, चाम्पा, कोरबा, अकलतरा, रायपूर, भाटापारा, भिलाई पॉवर हाऊस, दुर्ग, तिल्दा, डोंगरगड व राजनांदगाव आदी स्थानकांचा समावेश आहे. यात मशिन्सचे इन्स्टॉलेशन व काऊंटरचे संचालन केले जात आहे. या व्यवस्थे अंतर्गत काऊंटर बनवून मशीनद्वारे पाणी प्रवाशांच्या मागणीनुसार बाटल्यांमध्ये भरून दिले जात आहे. त्यासाठी कमीत कमी पैसे प्रवाशांना द्यावे लागत आहे.
अशाप्रकारे प्रवाशांना शुद्ध व शीतल पाणी मशीनद्वारे मिळत आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे सद्यस्थितीत नागपूर रेल्वे मंडळाच्या डोंगरगड स्थानकात एक व राजनांदगाव स्थानकात एक वॉटर वेंडिंग मशीन लावण्यात आली आहे. या मशीन्स लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्याद्वारे प्रवाशांना शुद्ध व शीतल जल कमी दरात उपलब्ध करुन दिले जाणार आहे. नागपूर मंडळातील विविध रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन्स लावण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यानुसार गोंदिया स्थानकात चार, भंडारा रोड येथे एक, इतवारी एक, छिंदवाडा एक, चांदाफोर्ट एक व बालाघाट स्थानकावर एक अशा एकूण सहा स्थानकांवर नऊ वॉटर वेंडिंग मशीन लावण्यात येणार आहेत.
पवित्र कार्यात रेल्वेही भागीदार
गोंदिया रेल्वे स्थानकावर प्रवाशांना गाडीच्या डब्याजवळ येवून पाणी भरून देण्याची मागील कित्येक वर्षांपासूनची परंपरा आहे. ‘मटका कोला’ म्हणून रेल्वे स्थानकावरील ही सुविधा चांगलीच प्रसिद्ध आहे. कोणताही गाडी असो प्रवाशांना कार्यकर्ते त्यांच्या डब्या जवळ जावून पाणी भरून देतात. पाण्याचे पुण्य असून या पवित्र कार्यात तरूणांपासून वृद्धही आपली सेवा देत पुण्य कमावीत आहेत. त्यात आता रेल्वे ही भागीदार झाली असून पाण्याच्या सोयीसाठी मशीन लावून प्रवाशांना अधीक सुविधाजनक करून देत आहेत.

Web Title: Four water vending machines that will be required at the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.