चार मार्गावर मानवविकासच्या बसफेºया बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 09:13 PM2017-08-24T21:13:09+5:302017-08-24T21:14:47+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावापासून शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी शासनाच्या मानवविकास कार्यक्रमातंर्गत बसफेºया सुरू करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावापासून शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी शासनाच्या मानवविकास कार्यक्रमातंर्गत बसफेºया सुरू करण्यात आल्या. मात्र खराब रस्त्यांमुळे चार मार्गावरील मानव विकासच्या बसफेºया बंद असल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.
गोंदिया आगारात एकूण ९६ बसेस आहेत. यापैकी मानव विकास कार्यक्रमांतर्गत २८ स्कूल बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या. प्रत्येक तालुक्यासाठी सात यानुसार चार तालुक्यांसाठी या २८ स्कूल बसेस आहेत. यात गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सालेकसा या तालुक्यांचा समावेश आहे. चारही तालुक्यांत स्कूल बसेससाठी मार्ग निश्चित करुन दिले आहे. जुलै ते एप्रिल महिन्यापर्यंत शाळा सुरू असताना या बसेस स्कूल बसेस म्हणून धावतात. त्यानंतर त्यांना तीन महिन्यांसाठी प्रवासी सेवेत त्यांचा उपयोग केला जातो. चार तालुक्यातील काही रस्ते पूर्णत: उखडले आहेत. त्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचते व परिणामी वाहतूक ठप्प होते. शिवाय पाऊस आल्यावर काही रस्ते बाधित होतात. त्यामुळे स्कूल बसेसचा प्रवास अर्धवटच होतो.
पाऊस आल्यावर किन्ही-डांगोर्ली-किन्ही मार्गाची स्कूल बस जात नाही. तर बिरसोला व भाद््याटोला बसेसला अर्धवटच प्रवास करून परतावे लागते. तर नान्हाटोला येथे जाणारी स्कूल बस जेथपर्यंत रस्ता चांगला आहे तिथपर्यंत जाऊन परत येते. बस फेºया बंद असल्याने विद्यार्थिनींच्या शैक्षणिक कार्यात अडचणी येत शैक्षणिक नुकसान होत आहे.
रस्ते दुरूस्तीसाठी सर्वेक्षणाची गरज
गोंदिया आगारांतर्गत धावणाºया बसेसचा प्रवास थांबला की त्या दिवशी होणाºया उत्पन्नावर फरक पडतो. शिवाय स्कूल बसेसचा प्रवास प्रभावित झाला की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे सदर मार्गाचे निरीक्षण करून रस्त्यांची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. या रस्त्यांच्या दुरूस्तीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडणार नाही व नियमित शाळेत येवू शकतील.