चौघांनी केले विष प्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 09:39 PM2018-08-12T21:39:21+5:302018-08-12T21:39:37+5:30
विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांत चार व्यक्तींनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याने सदर माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांत चार व्यक्तींनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याने सदर माहिती समोर आली आहे.
यात, गोरेगाव तालुक्यातील ग्राम पालेवाडा येथील रहिवासी ललिता तुळशीराम ताराम (४०) या महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला गोरेगावच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिची गंभीर प्रकृती पाहून तिला वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी रात्री हलविण्यात आले.
तर ग्राम तेढा येथील रहिवासी दिनेश तिलकचंद मस्के (३०) यानेसुद्धा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यालाही शनिवारी रात्री गोरेगावच्या ग्रामीण रूग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.
तसेच ग्राम डोंगरगाव येथील रहिवासी गोमता शांतीलाल हरिणखेडे (२०) व रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम सावरी येथील रहिवासी सुनील नत्थुलाल चौधरी (२३) यांनीसुद्धा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना रविवारी सकाळी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या चौघांवर उपचार सुरू होते.