चवथ्या मुख्य आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:21 PM2019-08-05T23:21:21+5:302019-08-05T23:21:36+5:30

ग्राम बाक्टी येथील बिबट्याच्या कातडीप्रकरणात वन विभागाने चवथ्या व मुख्य आरोपीला अटक केली आहे. शनिवारी (दि.३) सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत वन विभागाने त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात शिकारीचे साहित्य जप्त केले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात वन विभागाने तीन आरोपींना पूर्वीच अटक केली असून त्यांनीच या चवथ्या आरोपीकडून बिबट्याचे कातडे मिळाल्याची माहिती दिली.

Fourth main accused arrested | चवथ्या मुख्य आरोपीला अटक

चवथ्या मुख्य आरोपीला अटक

Next
ठळक मुद्देबिबट कातडीप्रकरण : मोठ्या प्रमाणात शिकारीचे साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : ग्राम बाक्टी येथील बिबट्याच्या कातडीप्रकरणात वन विभागाने चवथ्या व मुख्य आरोपीला अटक केली आहे. शनिवारी (दि.३) सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत वन विभागाने त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात शिकारीचे साहित्य जप्त केले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात वन विभागाने तीन आरोपींना पूर्वीच अटक केली असून त्यांनीच या चवथ्या आरोपीकडून बिबट्याचे कातडे मिळाल्याची माहिती दिली.
सविस्तर असे की, ग्राम बाक्टी येथील मंगेश नंदलाल बडोले यांच्या घरातून ३० जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात मंगेश बडोले (रा.बाक्टी), विनोद रुखमोडे (रा. कटंगधरा) व रविंद्र वालदे (रा. केसलवाडा, भंडारा) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांना सोमवारपर्यंत (दि.५) वन कोठडी सुनावण्यात आली असून या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी महेश एकनाथ लंजे (३२,रा.केसलवाडा, भंडारा) याच्याकडून कातडे मिळाल्याची माहिती दिली. यावरुन परिविक्षाधिन वनपरिक्षेत्राधिकारी व चौकशी अधिकारी डी.एम.पाटील (भावसे), वनपरिक्षेत्राधिकारी आर.आय.दोनोडे, एस.एस.शेंडे, डी.एस.सोनवाने, एस.जी.परशुरामकर, पी.डब्ल्यू.मेश्राम व वनकर्मचाऱ्यांसह महेश लंजे याच्या घरी धाड टाकली. यात महेश फरार होता परंतु त्याच्या घरातून वीज प्रवाही तार लांबविण्याच्या खुंट्या, तार, सुºया, काथे, हरणाची शिंगे, रानडुकराचे केस असे शिकार करण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात मिळून आले असून पथकाने ते ताब्यात घेतले आहे.
तर वन विभागाचे पथक महेश लंजे याच्या शोधात असताना तो अर्जुनी-मोरगाव येथील बस स्थानका शेजारी पानटपरी जवळ असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने शनिवारी (दि.३) सायंकाळी ५ वाजतादरम्यान मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता ते कातडे नवेगावबांध येथील योगेश आरसोडे यांच्यााकडून घेतल्याचे सांगीतले. योगेश आरसोडे यांचे जून महिन्यात निधन झाले आहे. तर यापूर्वी अटकेत असलेल्या आरोपी विनोद रुखमोडे यानेही हे कातडे आपल्या मृत आजोबाने दिल्याचे सांगीतले होते. यावरुन आरोपी मृत व्यक्तींची नावे सांगून चौकशीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चौकशी अधिकारी पाटील यांनी सांगितले.
या प्रकरणातील चौथा आरोपी महेश लंजे हाच यातील प्रमुख आरोपी असून हा एक सराईत शिकारी असावा व घराच्या झडतीत शिकारीचे मोठ्या प्रमाणावर सापडलेले साहित्य व वन्यप्राण्यांचे अवशेष बघता हा आरोपी सराईत व पट्टीचा शिकारी असल्याचे समजते असे वनपरिक्षेत्राधिकारी दोनोडे यांनी सांगीतले. त्याला बुधवारपर्यंत (दि.७) वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Fourth main accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.