यंदा ११०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2017 12:44 AM2017-02-06T00:44:55+5:302017-02-06T00:44:55+5:30

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार

Free admission to 1100 students this year | यंदा ११०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

यंदा ११०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

googlenewsNext

१३५ शाळांत २५ टक्के प्रवेश : अर्ज करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन
गोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. शासन निर्णयानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजना आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यांतर्गत यंदा जिल्ह्यातील १३५ शाळांत ११०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याचे बोलले जात असून शिक्षणावरील आजचा खर्च बघितल्यास ही बाब खरोखरच वाटते. या महागड्या शिक्षणामुळे अंगी गुण असलेला होनहार विद्यार्थी वंचीत राहू नये यासाठी शासनाने शिक्षणाचा अधिकार कायदा लागू केला. यांतर्गत गरजू व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांत २५ टक्के प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. परिणामी गरजू घटकाला याचा चांगलाच फायदा मिळत असून अशांची मुले शिक्षण घेत आहेत.
तर येणाऱ्या शिक्षण सत्रासाठी शाळा नोंदणी १६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी होणार आहे. पालकांनी आॅनलाईन प्रवेश अर्ज ५ ते २१ तारखेपर्यंत भरावयाचे आहेत. यात पहिली लॉटरी २७ आणि २८ तारखेला काढली जाईल. तर १ ते ९ मार्च पर्यंत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यावयाचे आहेत. प्रवेश घेण्याच्या विहित मुदतीनंतर शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा १० ते ११ मार्चपर्यंत दर्शवावयाच्या आहेत. दुसरी लॉटरी १४ व १५ मार्च रोजी असून १६ ते २१ मार्च पर्यंत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचे आहे.
२२ व २३ मार्चपर्यंत विहित मुदतीनंतर शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा दर्शवायच्या असून तीसरी लॉटरी २४ व २५ मार्च रोजी राहील. विहित मुदतीत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेणे २७ मार्च ते १ एप्रिल व विहित मुदतीनंतर शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा ३ मार्च ते ६ एप्रिल पर्यंत दर्शवायच्या आहेत.
चवथी लॉटरी ७ व ८ एप्रिल रोजी असून १० ते १५ एप्रिल दरम्यान विहित मुदतीत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचे आहे. शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा १७ व १८ एप्रिल रोजी दर्शवायच्या असून पाचवी लॉटरी १८ एप्रिल आणि २० एप्रिल रोजी राहील.
२१ ते २७ एप्रिल दरम्यान पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचे आहे. तर २८ ते २९ एप्रिल दरम्यान शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा दर्शवायच्या आहेत.
सदर प्रवेश प्रकियेदरम्यान संबधित तालुक्याचे गटसाधन केंद्रस्थळी मदत केंद्र निर्माण केले आहे. सदर काळात सर्व शाळांनी शाळा नोंदणी व पालकांनी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सी.एल. पुलकुंडवार व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Free admission to 1100 students this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.