कोरोनाबाधित रुग्णाचा गावात मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:30 AM2021-04-20T04:30:06+5:302021-04-20T04:30:06+5:30
केशोरी : केशोरी, कनेरी या दोन्ही गावांना प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून तालुका प्रशासनाने घोषित करून कडक संचारबंदी केली ...
केशोरी : केशोरी, कनेरी या दोन्ही गावांना प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून तालुका प्रशासनाने घोषित करून कडक संचारबंदी केली असतानाही येथील कोरोनाबाधित रुग्ण संचारबंदीचे उल्लंघन करून गावभर फिरत असल्याची ओरड होत आहे. त्यांच्यावर आळा घालून कोण कारवाई करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील केशोरी, कनेरी या गावात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यामुळे शासनाने गावात फिरण्यासाठी व येण्या-जाण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करुन कडक संचारबंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना चौकाचौकांत उभे करून गस्त ठेवली आहे. तरीही पोलिसांची नजर चुकवून कारण नसतानाही कोरोनाबाधित रुग्ण संचारबंदीचे उल्लंघन करुन गावभर फिरत असल्याचे दिसून येत आहेत. संचारबंदीचे नियम मोडून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश शासनासह स्थानिक आरोग्य विभागाने दिले आहेत. ठाणेदारासह पोलीस कर्मचारी विविध रस्त्यावर रखरखत्या उन्हात उभे राहून सेवा अर्जीत करीत असताना पोलिसांची नजर चुकवून कोरोनाबाधित रुग्ण गावभर फिरत असल्याचे सांगितल्या जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा कमी पडत असावी, याकरिता त्यांना सहकार्य करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कोरोना संसर्ग लढा समिती तयार करून पोलिसांच्या सहकार्यासाठी उभी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.