एसटी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास ! ड्रायव्हर, कंडक्टरांना कुटुंबासह करता येणार चार महिने कुठेही प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:09 IST2025-02-16T16:08:35+5:302025-02-16T16:09:11+5:30

Gondia : दोन सत्रांसाठी मिळतो फॅमिली पास

Free travel for ST employees! Drivers, conductors can travel anywhere with their families for four months | एसटी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास ! ड्रायव्हर, कंडक्टरांना कुटुंबासह करता येणार चार महिने कुठेही प्रवास

Free travel for ST employees! Drivers, conductors can travel anywhere with their families for four months

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी ज्याप्रमाणे योजना राबविल्या जात आहेत. त्याचप्रमाणे, चालक, वाहकांसाठीही मोफत पासच्या कालावधीत वाढ करण्याचा एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेतला आहे.


आधी कर्मचाऱ्यांना वर्षभरात फक्त दोन महिने जानेवारी ते जून व जुलै ते डिसेंबर या दोन सत्रांत मोफत प्रवास सुविधा मिळत होती. मात्र, आता ती चार महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आता वर्षभरात चार महिने मोफत फॅमिली पास मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत पास सुविधेत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


विविध कामगार संघटनांच्या मागणीनंतर परिवहन महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना आता वर्षभरात चार महिने मोफत प्रवासाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


आता वर्षभरात ४ महिने मोफत फॅमिली पास
पहिले सत्र जानेवारी ते जून या कालावधीत एक महिन्याचा पास आणि दुसरे सत्र जुलै ते डिसेंबरमध्ये एक महिन्याचा असा एकूण दोन महिन्यांचा मोफत पास देण्यात येत असे. मात्र, आता एका सत्रात दोन महिने, असे दोन सत्रांमध्ये मिळून चार महिन्यांचा मोफत पास दिला जाणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राज्यभर प्रवासाची मोठी सवलत मिळेल.


२ महिने महामंडळाकडून परिपत्रक जारी
या अगोदार वाहक, चालकांना वर्षभरात केवळ दोन सत्रांत दोन महिने मोफत प्रवास सुविधा मिळत होती. मात्र, आता वर्षभरात चार महिने मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करून दिला जाणार आहे.


पूर्वी किती महिन्यांचा पास मिळायचा?
पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभरात फक्त दोन महिने जानेवारी ते जून व जुलै ते डिसेंबर या दोन सत्रांत मोफत प्रवास सुविधा मिळत होती. मात्र, आता ती चार महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.


ही सुविधा फक्त कर्मचाऱ्यांसाठी
मोफत पास सुविधा फक्त एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राज्यभर प्रवासाची मोठी सवलत मिळणार आहे. यामुळे चालक, वाहक व त्यांच्या कुटुंबीयांना याचा फायदा होणार आहे.


पहिले सत्र : जानेवारी ते जून
२ महिने मोफत प्रवास
दुसरे सत्र : जुलै ते डिसेंबर
२ महिने मोफत प्रवास


दोन सत्रांसाठी मिळतो फॅमिली पास
एसटी विभागाकडून आधी जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या दोन सत्रांत दोन महिन्यांचा मोफत पास देण्यात येत असे. मात्र, आता या सुविधेत मोठी सुधारणा करत, एका सत्रात दोन महिने असे दोन सत्रांमध्ये मिळून चार महिन्यांचा मोफत पास दिला जाणार आहे.


 

Web Title: Free travel for ST employees! Drivers, conductors can travel anywhere with their families for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.