प्रवाशांना मोफत वाय-फाय सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:37 AM2017-10-26T00:37:14+5:302017-10-26T00:37:25+5:30
मागील तीन वर्षात गोंदिया रेल्वे स्थानकाचा चांगला विकास झाला. आता रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून त्यात भर म्हणून प्रवाशांसाठी नागपूर रेल्वे स्थानकाप्रमाणे नि:शुल्क वाय-फाय सेवेची सुविधा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील तीन वर्षात गोंदिया रेल्वे स्थानकाचा चांगला विकास झाला. आता रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून त्यात भर म्हणून प्रवाशांसाठी नागपूर रेल्वे स्थानकाप्रमाणे नि:शुल्क वाय-फाय सेवेची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
सद्यस्थितीत गोंदिया रेल्वे स्थानकावर वाय-फायच्या सुविधेची टेस्टिंग केली जात आहे. संपूर्ण स्थानकात लवकरच वाय-फाय सुरू होणार आहे. यासाठी प्रवाशांना आपला डेटा बंद करून वाय-फायने कनेक्ट केल्यावर एक ओटीपी येईल, त्या क्रमांकाने प्रवासी या सेवेचा उपयोग करू शकतील.
सदर रेल्वे स्थानकाच्या विकासात आणखी भरच पडणार आहे. काही वर्षांपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकाच्या होमप्लॅटफॉर्मवर विस्तीर्ण अशा शेडचे बांधकाम, लिफ्ट आणि स्वयंचलित पायºयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
यापैकी शेड बांधकाम व दोन फलाटांवर लिफ्टचे काम पूर्ण होवून त्याचे लोकार्पणही करण्यात आले. सद्यस्थितीत प्लॅटफॉर्म-२ वर आणखी एका लिफ्टचे काम सुरू आहे. याचा लाभ दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मिळत आहे. शिवाय आता याच फलाटावर रॅम्पचे काम व फलाटाची लांबी वाढविण्याचे काम सुरू आहे. सदर दोन्ही कामे लवकरच पूर्णत्व: जाणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
होमप्लॅटफॉर्मवर एस्कलेटरचे काम आॅगस्ट महिन्यातच पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी एस्कलेटरची टेस्टिंगही करण्यात आली. मात्र या सेवेचे अद्याप लोकार्पण करण्यात आले नाही. प्लॅटफॉर्म-२ वरील रॅम्प, लिफ्ट व होम प्लॅटफॉर्मवरील एस्कलेटर या तिन्ही सेवांचे एकत्रच लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आॅटोमेटिक तिकीट व्हेंडर मशिनच्या सुविधेसह आता त्याच प्रकारातील आॅटोमेटिक क्वॉईन आॅपरेटेड वॉटर व्हेंडर मशिनची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
तिरोडा रेल्वे स्थानक विकासापासून दूर
अदानी पॉवर प्लांटसारखा मेगाप्रोजेक्ट तिरोडा येथे असतानाही तेथील रेल्वे स्थानकाचा अद्यापही विकास झालेला नाही. मागील दोन वर्षांपासून तेथे इलेक्ट्रॉनिक उद्घोषणा यंत्र धूळ खात पडून आहे. सदर यंत्र अद्यापही संचालित करण्यात आले नाही. या स्थानकावर इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड नसल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना आपल्या डब्यात जाण्यासाठी मोठीच कसरत करावी लागते. नागरिकांची दुसºया फूटओव्हर ब्रिजची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. तसेच फलाटांवर योग्य प्रमाणात खुर्च्यांची सोय नाही. शिवाय फलाटांवर छताचा अभाव असल्याने उन्हाळा व पावसाळ्यात प्रवाशांची मोठीच फजिती होते.