वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:00 AM2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:00:20+5:30

सालेकसा तालुक्याच्या मोठा भूभाग घनदाट वनाने आच्छादीत असून येथील जंगलात तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्याची संख्या भरपूर आहे. येथील जंगल इतर राज्यांच्या घनदाट वनक्षेत्राशी जुळलेले असल्यामुळे हिंसक प्राण्यांसह सर्वच प्राण्यांचा वावर बघायला मिळत आहे. या घनदाट जंगलांना लागून गेलेले पक्के रस्ते व त्या रस्त्यावर प्रवासी आणि वाहनांची सतत ये-जा यामुळे वन्यप्राण्यांना मुक्तसंचार करणे कठीण झाले होते.

Freedom of wildlife increased | वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार वाढला

वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार वाढला

Next
ठळक मुद्देकॅरिडोरमधून निघू लागले बाहेर : ‘लॉकडाऊन’मुळे झाले मुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी सरकारने ‘लॉकडाऊन’ केला असून याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसत आहे. परंतु वन्यप्राण्यांसाठी हा ‘लॉकडाऊन’ पर्वणी ठरत असून माणसाला घरी रहावे लागत असताना वन्यप्राणी बिनधास्त मुक्त संचार करीत आहेत.
सालेकसा तालुक्याच्या मोठा भूभाग घनदाट वनाने आच्छादीत असून येथील जंगलात तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्याची संख्या भरपूर आहे. येथील जंगल इतर राज्यांच्या घनदाट वनक्षेत्राशी जुळलेले असल्यामुळे हिंसक प्राण्यांसह सर्वच प्राण्यांचा वावर बघायला मिळत आहे. या घनदाट जंगलांना लागून गेलेले पक्के रस्ते व त्या रस्त्यावर प्रवासी आणि वाहनांची सतत ये-जा यामुळे वन्यप्राण्यांना मुक्तसंचार करणे कठीण झाले होते. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे एवढा बदल झाला की रस्त्यावर माणूस व वाहनांचे येणे जाणे बंद झाल्याने हे वन्यप्राणी आता स्वच्छंद विहार करताना दिसत आहेत.
तालुक्यात सालेकसा ते दरेकसा व पुढे चांदसूरजपर्यत राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. तसेच दरेकसा, बिजेपार, पिपरिया परिसरात व इतर परिसरात सुध्दा सधन वन परिसर आहे. अशात वन्यप्राणी एका भागातून दुसऱ्या भागात जाताना ठराविक कॅरिडोर मधूनच आपला प्रवास करतात. अशात त्यांच्या कॅरिडोर मार्गावर मानव निर्मित पक्के रस्ते आडवे येतात आणि त्या रस्त्यावर धावणारे वाहन वन्यप्राण्यांना प्रवासात अडचण निर्माण करीत आहेत. याला मानवाद्वारे वन्यप्राण्यांच्या साम्राज्यावर अतिक्रमण म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
राज्य महामार्गावर नवाटोलानंतर हाजराफॉल परिसर दरेकसा आणि चौकीदरम्यान येणारा परिसर व इतर काही ठिकाणी वन्यप्राण्यांचे कॅरिडोर असून या ठिकाणी ते एका भागातून दुसºया भागात जाण्यासाठी रस्ता ओलांडताना अनेकवेळा मानवी आक्रमणाला बळी सुध्दा पडतात. हीच परिस्थिती तालुक्यातील आतील भागातील जंगल परिसरात असून वन्यजीवांची शिकार होते. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे वन्यप्राणी कदाचित स्वत: खूपच नशीबवान समजत असतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पर्यावरणात मोठा बदल
‘लॉकडाऊन’मुळे रस्त्यावरुन लोकांचे व वाहनांचे येण-जाणे बंद झाले.त्यामुळे वाहनांतून निघणारा धूर जो हवेला प्रदूषित करीत होता तो नाहीसा झाल्याने आॅक्सीजनचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे हवेत वाढलेले आॅक्सीजन मानवी जीवनासह वन्यजीव पशू पक्ष्यांसाठी लाभदायी ठरत आहे. नैसर्गिकरित्या विचार केला तर ‘लॉकडाऊन’ करणे सृष्टी वाचविण्यासाठी मोलाचे योगदान करण्यासारखे आहे.

Web Title: Freedom of wildlife increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.