मित्रांनीच केले मित्राचे तुकडे

By Admin | Published: May 16, 2017 12:55 AM2017-05-16T00:55:45+5:302017-05-16T00:55:45+5:30

गोंदिया येथील कुंभारेनगराच्या सिंगलटोली येथील प्रभाकर किशन मानकर (१७) या मुलाला त्याच्या मित्रांनी पार्टी करण्याच्या नावावर नेऊन त्याचा खून केला.

Friends of friends made pieces | मित्रांनीच केले मित्राचे तुकडे

मित्रांनीच केले मित्राचे तुकडे

googlenewsNext

७ महिन्यानंतर घटना उघडकीस : एलसीबीने अटक केलेल्या आरोपीने दिली कबुली
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया येथील कुंभारेनगराच्या सिंगलटोली येथील प्रभाकर किशन मानकर (१७) या मुलाला त्याच्या मित्रांनी पार्टी करण्याच्या नावावर नेऊन त्याचा खून केला. परंतु स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपीला अटक केली.
सिंगलटोली येथील प्रभाकर मानकर हा दिवाळीच्या नंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत ऊस विक्री करायचा. उर्वरित वेळेत चने-फुटाणे विकून वडिलास मदत करायचा. सन २०१६ च्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तो ऊस विकून घरी गेल्यानंतर त्याच्या चार मित्रांनी पार्टी करण्याच्या नावावर प्रभाकरला घेऊन गेले. त्याने ऊस विकून जमविलेले ११ हजार रुपये त्याच्याजवळ होते. पार्टी करण्याच्या नादात मित्रांमध्ये झालेल्या वादात तिघांनी प्रभाकरचा खून करुन सिंगलटोली येथील रेल्वे क्वार्टरच्या कोरड्या असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह टाकून दिला. त्या विहिरीत चिखल आहे. शरीरापासून मुंडके वेगळे, धड वेगळे, हात वेगळे, पाय वेगळे असे मृतदेहाचे तुकडे करुन पोतीत भरुन विहिरीत टाकण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस गोंदिया शहरातील एका दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक करण्यास गेले असताना गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक (२२८/१६) अन्वये भादंविच्या कलम ३६६, ३६४, ३४ अन्वये गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणातील फरार आरोपी पंकज देवराज मेश्राम (२७) रा. भीमनगर याला आणले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने सदर घटनेची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. प्रभाकर घरी न परतल्याने त्याच्या आई-वडिलांनी गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली होती. गोंदिया शहर पोलिसांनी अपराध क्रमांक (२२८/१६) अन्वये भादंविच्या कलम ३६६, ३६४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंकज मेश्रामला अटक केल्यावर सदर प्रकरण उघडकीस आले.
सोमवार (दि.१५) रोजी दुपारी गोंदिया शहर पोलिसांनी सिंगलटोली येथील रेल्वे क्वार्टरच्या विहिरीतून सदर मृतदेह शैलेश आत्माराम गजभिये रा. भीमनगर यांच्या हातून काढून उत्तरीय तपासणीसाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. प्रभाकरने घटनेच्या दिवशी परिधान केलेली टी-शर्ट या विहिरीत आढळली. सोबत मृतदेहाजवळ मोठा दगड असल्याने तो दगडही पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणातील उर्वरित दोनपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगितले जाते. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांची कार्यवाही सुरुच होती.

हरवला वंशाचा दिवा
सिंगलटोली येथील किशन मानकर यांना पाच मुली व प्रभाकर एकटाच मुलगा होता. रात्रंदिवस सोबत राहणाऱ्या मित्रांसोबत राहाणे, खेळणे बाळगणे, फिरायला जाणे यामुळे घरचेही बिनधास्त होते. परंतु मित्र म्हणून वावरणारेच लोक खून करतील याची कल्पनाही नसताना पार्टी करण्याच्या नावावर घेऊन गेलेल्या मित्रांनी क्षुल्लक कारणातून भांडण करून खून केला. किशन यांचा एकुलता एक मुलगा मित्रांनीच संपविला.
बालकांकडून वाढताहेत शारीरिक गुन्हे
गोंदिया शहरात होणाऱ्या शारीरिक गुन्ह्यांमध्ये १८ वर्षाखालील बालकांचा समावेश असतो. खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या या प्रकरणात गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा समावेश असतो. आईवडिलांच्या दुर्लक्षामुळे अल्पवयीन मुले शारीरिक गुन्हे करीत आहेत.

Web Title: Friends of friends made pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.