भाकपचा तहसील व पंचायत समितीवर मोर्चा
By admin | Published: March 5, 2017 12:17 AM2017-03-05T00:17:22+5:302017-03-05T00:17:22+5:30
भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून ग्राम बनाथर-जगनटोला येथील वनजमीन ३० वर्षापासून कसणाऱ्यांना मालकी
गोंदिया : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून ग्राम बनाथर-जगनटोला येथील वनजमीन ३० वर्षापासून कसणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळणे, ग्रामपंचायत धामनगावचे सरपंच, ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात व निष्पक्ष कार्यवाहीच्या मागणीला घेऊन तहसील कार्यालय व पंचायत समितीवर सचिव मिलींद गणवीर, सहसचिव रामचंद्र पाटील, करुणा गणवीर, प्रल्हाद उके यांच्या नेतृत्वात पाल चौकातून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात बनाथर-जगनटोला येथील १८ भुमिहिन अतिक्रमणकर्त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याकरिता २०११ मध्ये वनसमितीच्यामार्फत दिलेल्या प्रकरणावर अजूनही कारवाई करण्यात आली नाही. म्हणून नियमाप्रमाणे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पंचायत समितीवर मोर्च्यातर्फे विस्तार अधिकारी पटले एवं खोटेले यांना सादर निवेदनात धामणगाव-सतोना येथील मग्रारोहयो योजनेत सरपंच, ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचाराची, बोगस हजेरीची निष्पक्ष चौकशी करुन दोषीवर कार्यवाही करने, घरकुल व शौचालयाचा लाभ पात्र लोकांना देणे, वेग-वेगळ्या नावाने सरपंच व आशा सेविकेच्या पदावर राहून आर्थिक लाभ घेणाऱ्या ग्रामपंचायत धामनगावच्या सरपंचावर फौजदारी गुन्हा कायम करने, दोन पदावर राहून कार्य न करण्याचे नियम असून सुद्धा जि.प. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून कार्यवाही न करण्याची चौकशीची मागणी करण्यात आली. या मोर्च्यात राजेंद्र बागडे, अशोक बागडे, क्रांती गणवीर, आनंद वासनिक, बिरजलाल सलाम, महेश बर्वे सह १०० वर स्त्री-पुरुष सामील होते.(शहर प्रतिनिधी)