भाकपाचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 07:59 PM2018-03-25T19:59:17+5:302018-03-25T19:59:17+5:30

शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांच्या बलिदाना दिनानिमित्त शुक्रवारी भारतीय कम्युनिष्ट पार्टीतर्फे राजलक्ष्मी चौकात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले.

Front on CPI's sub-divisional office | भाकपाचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

भाकपाचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

Next
ठळक मुद्देविविध मागण्यांचे निवेदन : राजलक्ष्मी चौकात निदर्शने

आॅनलाईन लोकमत
गोंदिया: शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांच्या बलिदाना दिनानिमित्त शुक्रवारी भारतीय कम्युनिष्ट पार्टीतर्फे राजलक्ष्मी चौकात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले.
या वेळी दिलेल्या निवेदनातून सांप्रदायिक उन्माद निर्माण करणे, जातीधर्माचे सामंजस्य, सद्भाव व राष्टÑीय एकात्मतेला धोका, जातीय व धार्मिक दंगली घडवून आणण्याची संधी, (फासिस्ट) विचारसरणी पसरवून व्ही.आय. लेनिन, रामास्वामी पेरीयार, डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांचा या वेळी निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व प्रकणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.
निवेदनानुसार, भाजपा सरकारने निवडणुकीच्या वेळी जी आश्वासने दिली ते पूर्ण करण्यात हे सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरले आहे. सीमा प्रश्न, काश्मीर समस्या, काळेधन व भ्रष्टाचार, बँक घोटाळे, दरवर्षी २ कोटी बेरोजगार तरुणांना रोजगार देणे, महागाई कमी करणे, शिक्षणाचे खासगीकरण, शासकीय शाळा बंद करणे, पारदर्शक पद्धत, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव देणे या सर्व मुद्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. दलित, आदिवासी, महिला व अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढत आहेत. हे प्रश्न सरकारने त्वरित मार्गी लावावे अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाकपाने दिला आहे.
मोर्चाचे नेतृत्व राज्य कार्यकारिणी सदस्य हौसलाल रहांगडाले, सचिव जिल्हा कौंसिल मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, जिल्हा सहसचिव शेखर कनोजिया, राज्य कॉन्सिल सदस्य करूणा गणवीर, सी.के. ठाकरे, प्रल्हाद उके, परेश दुरुगवार, छन्नू रामटेके, शंकर बिंझलेकर, अशोक मेश्राम, दुलीचंद कावळे, क्रांती गणवीर, नत्थू मडावी, जितेंद्र गजभिये यांनी केले.

Web Title: Front on CPI's sub-divisional office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.