१४.१५ किमी रस्त्यासाठी १०३६ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:10 PM2017-11-29T22:10:29+5:302017-11-29T22:11:11+5:30

आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील १४.१५ किमी रस्त्यासाठी १०३६ लाख रूपये ग्रामीण विकास विभागाने २८ नोव्हेंबर रोजी मंजूर केले आहे.

A fund of Rs. 1036 lakh for 14.15 km roads | १४.१५ किमी रस्त्यासाठी १०३६ लाखांचा निधी

१४.१५ किमी रस्त्यासाठी १०३६ लाखांचा निधी

googlenewsNext
ठळक मुद्देअग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश : गावातील रस्त्यांची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील १४.१५ किमी रस्त्यासाठी १०३६ लाख रूपये ग्रामीण विकास विभागाने २८ नोव्हेंबर रोजी मंजूर केले आहे.
या कामाची सुरूवात लवकरच होणार आहे. कामठा-नवरगाव कला या ५.९२३ रस्त्यासाठी ४६० लाख, गिरोला -झिटाबोटी-पिपरटोला रस्त्यासाठी ४.१० कि.मी. रस्त्यासाठी २५८ लाख, लोधीटोला-रावणवाडी १.८ किमी रस्त्यासाठी १४३ लाख व टेमणी ते पाटीलटोला या २.९० किमी रस्त्यासाठी १७५ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे.
आ. गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने यापूर्वीही १७.५० कोटीतून ३९ कि.मी रस्ता तयार करण्यात आला. त्यात गुदमा ते छोटा गोंदिया ८.५० कि.मी रस्त्यासाठी ३९३ लाख रूपये, कटंगटोला-चांदणीटोला-नवाटोला या ४.५० कि.मी रस्त्यासाठी २१० लाख, खमारी-मुंडीपार या १०.३० किमी रस्त्यासाठी ४५६ लाख, सिरपूर ते सिसरपूटोला ३.३० किमी रस्त्यासाठी १.४० लाख, रावणवाडी-तेढवा ७.८६ किमी रस्त्यासाठी ३.६६ लाख, कामठा-लंबाटोला २.३५ या रस्त्यासाठी १.११ लाख, रतनारा-गोंडीटोला (लोहारा) २.३० रस्तञयासाठी ७६ लाख रूपये मंजूर करवून घेतले होते. कोरणी-काटी रस्त्यावरील कचारनाला व जामुननाला येथे ६ कोटीतून पुलाचे बांधकाम,कटंगी-बरबससपूरा रस्त्यावर ३ कोटी रूपयातून दोन पुलाचे बांधकाम, फुलचूर नाक्यावर पूल, पांगोली नदीवर पूल, काटी-तेढवा मार्गावर पूल तयार करण्यात पुढाकार घेतला आहे. ही विकास कामे खेचून आणल्याबद्दल आ. गोपालदास अग्रवाल यांचे आभार जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, सभापती विमल नागपुरे, शिक्षण सभापती पी.जी.कटरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, जि.प.सदस्य विजय लोणारे, विघोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सीमा मडावी, शेखर पटले, पं.स. ससभापती माधुरी हरिणखेडे, माजी सभापती स्रेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, पं.स. सदस्य प्रमिला करचाल, निता पटले, विनीता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायनी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे बंटी भेलावे यांनी मानले.

Web Title: A fund of Rs. 1036 lakh for 14.15 km roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.