पर्यटन विकासासाठी निधी कमी पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:33 AM2019-01-19T00:33:31+5:302019-01-19T00:33:57+5:30

गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र पर्यावरणाचा बाऊ समोर करुन पर्यटन विकासात बाधा निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्ती निरंतर करीत आहे.

Funding will not be reduced for the development of tourism | पर्यटन विकासासाठी निधी कमी पडणार नाही

पर्यटन विकासासाठी निधी कमी पडणार नाही

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : २५ लाखांच्या रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र पर्यावरणाचा बाऊ समोर करुन पर्यटन विकासात बाधा निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्ती निरंतर करीत आहे. मात्र आम्ही कायदेशीर मार्ग काढून जिल्ह्याच्या पर्यटन विकास करीत राहू आणि याकरिता निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
नवेगावबांध पर्यटन स्थळ अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी बुधवारी (दि.१६) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स.सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. नैरागकर, खंडविकास अधिकारी जमईवार, विजया कापगते, मधुकर मरस्कोल्हे, खुशाल काशिवार, केवळराम पुस्तोडे, तंमुस अध्यक्ष महादेव बोरकर, मुलचंद गुप्ता, अण्णा डोंगरवार, चंद्रशेखर मेश्राम तसेच ग्रा.पं.चे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
नवेगावबांध ग्रामपंचायतकरिता १०० बैठकी खुर्च्याकरिता ४ लक्ष रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा याप्रसंगी ना. बडोले यांनी केली. रमाई आवास योजनेंतर्गत शत प्रतिशत लाभार्थ्यांना घर देणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे छत्तीसगड राज्यात धानाला जास्त भाव तेथील सरकार देत असल्याचा माजी खासदार नाना पटोले खोटा प्रचार करीत असल्याचा आरोप याप्रसंगी बडोले यांनी आपल्या भाषणातून केला. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता वैरागकर यांनी मांडले. संचालन अशोक परशुरामकर यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी पी.आर. चव्हाण यांनी मानले.

झाशीनगर योजनेचे लोकार्पण व भूमिपूजन फेब्रुवारीत
नवेगावबांध विस्तार अंतर्गत पिण्याच्या पाण्याबद्दल बोलताना ना. बडोले यांनी, झाशीनगर उपसा सिंचनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन झाले आहे. त्यामुळे फेबु्रवारी महिन्यात पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करुन जनतेच्या सिंचन प्रश्नावर कायम स्वरुप तोडगा निघणार असल्याचे सांगीतले. तसेच शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याबद्दल आपले सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Funding will not be reduced for the development of tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.