चीनी वस्तूंची प्रेतयात्रा व दहन

By Admin | Published: July 10, 2017 12:42 AM2017-07-10T00:42:28+5:302017-07-10T00:42:28+5:30

भारत-चीन सीमेवर चीनद्वारा घुसखोरीच्या कुरघोड्या नित्याचीच बाब झाली आहे. भारतीय बाजारपेठेत चीनच्या वस्तूंची धूम आहे.

The funeral of Chinese goods and combustion | चीनी वस्तूंची प्रेतयात्रा व दहन

चीनी वस्तूंची प्रेतयात्रा व दहन

googlenewsNext

देशाभिमानाचा परिचय : तिबेटीयन बांधवही सरसावले
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : भारत-चीन सीमेवर चीनद्वारा घुसखोरीच्या कुरघोड्या नित्याचीच बाब झाली आहे. भारतीय बाजारपेठेत चीनच्या वस्तूंची धूम आहे. चीन भारतीय बाजारपेठेमुळे आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊन भारतावरच पलटवार करतो आहे.
त्या निषेधार्थ रविवारी (दि.९) अर्जुनीवासीयांनी चीनी वस्तूंची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली व या वस्तूंचे दहन स्मशानभूमीत करुन देशाभिमान जागृततेचा परिचय दिला. या अनोख्या कार्यक्रमात गावकरी, शालेय विद्यार्थी व व्यापारीसुद्धा सामील झाले होते. चीनी वस्तूंची खरेदी व वापर करणार नाही अशी शपथ घेऊन इतरांनीही वापर व खरेदी करु नये यासाठी परावृत्त करण्याचा संकल्प स्मशानभुमीत घेतला. या प्रेतयात्रा, दहन व वृक्षारोपण या कार्यक्रमाचे आयोजन नगर विकास मंचच्यावतीने करण्यात आले होते. या उपक्रमाला एस.एस.जे. महाविद्यालय, सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना पथक, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व गावकऱ्यांनी सहभाग नोंदविला. ही प्रेतयात्रा येथील दुर्गा चौकातून रविवारी (दि.९) सकाळी १० वाजता निघाली व मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत स्मशानभूमीत पोहोचली. व्यापाऱ्यांनी सुद्धा समर्थन दर्शवित चीनी वस्तू दहनासाठी संकलन वाहनात घातल्या. स्मशानभूमीत ही प्रेतयात्रा पोहोचल्यानंतर तेथे उपस्थितांनी चिनी वस्तूंच्या वापर व खरेदी करणार नाही अशी सामूहिक शपथ ग्रहण केली. त्यानंतर तिरडीवर लोकांनी स्वयंस्फूर्तीने ठेवलेल्या चीनी वस्तूंचे दहन केले.
प्रेतयात्रा मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करीत असताना गावकऱ्यांनी आपल्या घरातील चीनी वस्तू आणून तिरडीवर घालाव्यात अशा उद्घोषणाद्वारे ओमप्रकाशसिंह पवार, प्रा. शरद मेश्राम, डॉ. गजानन डोंगरवार, लोपसंग टेम्पा, नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, आनंदकुमार जांभुळकर, कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध ढोरे, नगरसेवक येमू ब्राम्हणकर, सुरेंद्रकुमार ठवरे, प्रा. इंद्रनिल काशीवार, प्रा.जे.डी. पठाण यांनी आवाहन करुन आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. पश्चात स्मशानभुमीत वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी राजकिशोर शाह, गिरीश बागडे, मोरगावचे उपसरपंच राजू पालीवाल, नवीन नशिने, एस.जे. महाविद्यालयाचे प्रा.डॉ. राजेश चांडक, प्रा. शरद मेश्राम, सदानंद मेंढे, शाम चांडक, यशवंत कुंभरे, लोकेश उखरे, अश्विनसिंह गौतम, प्राचार्य सुनील पाऊलझगडे, रामू जिवानी, महेश पालीवाल, नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, नगरसेविका प्रज्ञा गणवीर, वंदना शहारे, नगरसेवक माणिक मसराम, हेमंत भांडारकर, राजू श्विणकर, बालू बडवाईक, विकास नगरकर, राधश्याम भेंडारकर, विकास कोराम, सुमित पशिने, हिमालय पाचोळे, योगराज मिश्रा, लुमेष सूर्यवंशी, क्रिष्णा कोहरे, एल.एस. ब्राम्हणकर, विजय इरले, प्रा. ठाकरे, सुरज चुटे, शंभूदेव मुरकुटे, प्रकाश बागडे, नाना शहारे, जितेंद्र ठवकर, दिलीप लोधी, प्रशांत गाडे, पंचम भलावी व अर्जुनी-मोरगाववासी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

तिबेटीयनांचाही सहभाग
चीनने तिबेटवर आक्रमण केले. तिबेटमध्ये वास्तव्यास असलेल्या लोकांवर चीनकडून अत्याचार केला जात आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव नार्गोलिंग तिबेटीयन वसाहतीतील शरणार्थी तिबेटीयनांची कित्येक वर्षापासून स्वतंत्र तिबेटची मागणी आहे. यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. रविवारी अशी शवयात्रा निघत असल्याची माहिती मिळताच तिबेटीयनांनी चीनी वस्तू आणून शवयात्रेत उपस्थिती दर्शविली. तिबेटीयनांचे गुरु लोपसंग टेम्पा यांनी असे कार्यक्रम वारंवार घ्यावे तिबेटीयन सदैव सहकार्य करतील असे मार्गदर्शन केले. यावेळी लोपसंग सिरींग, केलसंग छोटा, तेनजीन पासंग, तेनजीन तांजे, रिनजीन छनपेल, लहामो सिरींग, गुरुने देवेंग उपस्थित होते.

Web Title: The funeral of Chinese goods and combustion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.