अंत्यविधी करणारे कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:12+5:302021-06-30T04:19:12+5:30
शहरात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये कंटेन्मेंट झोन, कोविड तपासणी ...
शहरात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये कंटेन्मेंट झोन, कोविड तपासणी केंद्र, कुटुंब सर्वेक्षण, शासनाच्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी करणे, बाजाराची व्यवस्था करणे, शहराला सॅनिटायझेशन करणे, कोविड-१९ च्या उपाययोजनांची जनजागृती करणे, लसीकरण मोहीम राबविणे, कोविड रुग्णांचे अंत्यविधी करणे अशा सगळ्या प्रकारची जबाबदारी गोंदिया नगर परिषदेने पार पाडली आणि गोंदिया शहरातील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार गोंदिया नगर परिषद अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांना प्रोत्साहित करावे जेणे करून सर्व कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यात मदत होईल. अशा अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना प्रशस्तिपत्र आणि बौध्दचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पुढेही वेळोवेळी अधिकारी व कर्मचारी यांना गौरविण्यात येणार आहे. असे संबोधन जिल्हाधिकारी खवले यांनी व्यक्त केले. यावेळी नोडल अधिकारी धनराज बनकर, कनिष्ठ अभियंता सुमेध खापर्डे, अंत्यविधी करणारी टीम उपस्थित होते.