विद्यार्थ्यांचे भवितव्य हेच आमचे आद्य कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:23 AM2021-07-17T04:23:29+5:302021-07-17T04:23:29+5:30

सभेत प्राचार्या वीणा नानोटी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचे भवितव्य हेच आमच्या शाळेचे आद्य कर्तव्य आहे. यासाठी पालकांचे ...

The future of the students is our first duty | विद्यार्थ्यांचे भवितव्य हेच आमचे आद्य कर्तव्य

विद्यार्थ्यांचे भवितव्य हेच आमचे आद्य कर्तव्य

Next

सभेत प्राचार्या वीणा नानोटी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचे भवितव्य हेच आमच्या शाळेचे आद्य कर्तव्य आहे. यासाठी पालकांचे समर्थन असणे आवश्यक असल्याचे सांगितले. संस्था सचिव अनिलकुमार मंत्री यांनी जोपर्यंत माझ्या शाळेत माझा विद्यार्थी घडत नाही तोपर्यंत मला आनंद वाटत नाही हे आतापर्यंतचे माझे सुखद अनुभव असल्याचे सांगितले. सभेत शाळा सुरु करण्याचा निर्णय प्राचार्य व पालकांच्या सहमतीने घेण्यात आला. शासन नियमनानुसार व शाळेच्या नियमाने शाळा ही दोन टप्प्या मध्ये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाहेरगावी असणारे विद्यार्थी व स्थानिक विद्यार्थी यांच्यासाठी बॅचनुसार त्यांची विभागणी प्राचार्या वीणा नानोटी यांच्या आदेशानुसार करण्यात आली. हा सर्व ठराव शाळेच्या प्राचार्या तसेच उपस्थित पालकवर्ग यांच्या समक्ष मंजूर करण्यात आला. प्रास्ताविक पर्यवेक्षक मुकेश शेंडे यांनी केले तर संचालन व आभार लीना मिसार यांनी मानले.

Web Title: The future of the students is our first duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.