भविष्यात गोंदिया होईल आरोग्य सुविधा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 09:23 PM2018-10-29T21:23:03+5:302018-10-29T21:23:24+5:30
गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीनंतर रिलायन्स समूहाच्या कर्करोग रुग्णालयाची निर्मिती झाली. यामुळे गोंदिया तालुका, बालाघाट, राजनांदगाव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी वैद्यकीय केंद्र बनत असून लवकरच सर्व रोगांवर उपचाराची संपूर्ण व्यवस्था होईल, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीनंतर रिलायन्स समूहाच्या कर्करोग रुग्णालयाची निर्मिती झाली. यामुळे गोंदिया तालुका, बालाघाट, राजनांदगाव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी वैद्यकीय केंद्र बनत असून लवकरच सर्व रोगांवर उपचाराची संपूर्ण व्यवस्था होईल, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.
दत्तोरा येथे रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे, डॉ. सतिश जायस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जि.प.सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, पं.स.उपसभापती चमन बिसेन, पं.स. सदस्य हरिचंद कावळे, बंटी भेलावे, ग्राम काँग्रेसचे अध्यक्ष सुरजलाल महारवाडे, रंजित गणवीर, अशोक गणविर, गौरी खोटेले, रमेश धुर्वे, सिद्धार्थ गणवीर, दिनेश मडावी, गणेश गोखले, दिलीप पंधरे, पवन भट, कोहिनुर वासनिक, राजू धुर्वे, सिद्धार्थ गणवीर, भूमेश चौरे, डॉ. शिवशंकर हेमणे, अरविंद टेंभुर्णीकर, रुपेश रहांगडाले, सरपंच रविंद्र पंधरे, भास्कर रहांगडाले उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने केंद्रस्तरावर प्रयत्न केले.
यामुळे गोंदिया तालुक्यात हेल्थ वेलनेस स्किम लागू झाली असून ५६ आरोग्य उपकेंद्रामध्ये आयुर्वेदिक चिकित्सकाची नियुक्ती करण्यात आली. या चिकित्सकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कार्यक्षेत्रातील २० कुटुंबीयांसोबत स्वत: चिकित्सक दररोज तपासणी व आरोग्य सेवा देतील.
शिबिरात ४२५ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून ईसीजी, ब्लडप्रेशर, शुगर, नेत्ररोग, दंतरोग, चर्मरोग, गरोदर माता व कुपोषित बालकांची तपासणी करुन आवश्यकतेनुसार औषधांचे वितरण करण्यात आले.
११ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी केटीएस, बी.जी. डब्ल्यू.रुग्णालयात पाठविण्यात आले.