गंगाबाईत बेड कमी ; एका बेडवर दोन बाळंतिणींना राहावे लागते (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:55 AM2021-03-04T04:55:10+5:302021-03-04T04:55:10+5:30
गोंदिया : जिल्ह्यात एकमेव असलेल्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात वर्षाकाठी ७ हजार महिलांची प्रसूती होते. २०० खाटांच्या महिला रुग्णालयात ...
गोंदिया : जिल्ह्यात एकमेव असलेल्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात वर्षाकाठी ७ हजार महिलांची प्रसूती होते. २०० खाटांच्या महिला रुग्णालयात बाळंतिणींसाठी १३५ खाटा देण्यात आल्या आहेत. परंतु या रुग्णालयात येणाऱ्या बाळंतिणींची संख्या जास्त असल्याने त्या १३५ खाटाही कमी पडत आहेत. परिणामी एका बेडवर दोन बाळंतिणींना राहावे लागते. जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असून जिल्ह्यातील गर्भवतींची प्रसूती आरोग्य संस्थेतच करण्याचे प्रमाण ९९ टक्के आहे. ग्रामीण भागातील आरोग्य संस्थेत गुंतागुंतीच्या प्रसूती होत नसल्याने त्या गर्भवतींना ‘रेफर टू गंगाबाई’ केले जाते. त्यामुळे मंजूर असलेल्या खाटाही गंगाबाईत गर्भवतींना कमी पडत आहेत. जवळ जवळ सेंच्युरीच्या जवळ असलेली बाई गंगाबाई जिल्ह्यातील बाळंतिणींना सेवा देत आहे. परंतु अनेकदा खाटांअभावी एका खाटेवर दोन बाळंतिणी अशी अवस्था या रुग्णालयात आहे.
....................
बॉक्स
डॉक्टरांचा राऊंड होतो वेळेवर
१) सकाळी ९ ते १० या एक तासाच्या वेळात गर्भवती महिला व प्रसूती झालेल्या बाळंतिणींचा राऊंड डॉक्टरांकडून घेतला जातो. सायंकाळीही एक तासाचा राऊंड घेतला जातो.
२) ज्यांना सुटी द्यायची आहे किंवा बाळंतपण झालेल्यांना काही त्रास आहे त्यांची विचारपूस या राऊंडच्यावेळी केली जाते.
३) राऊंडदरम्यान बाळंतिणींना औषधे लिहून दिले जातात. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांसंदर्भात काही विचारणा करायची असल्यास राऊंड होताच त्यांना विचारणा करण्यासाठी वेळ दिला जातो.
...................
२४ तास पाणी व वीज
बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात २४ तास वीज व पाण्याची सोय उपलब्ध आहे. थंडीच्या दिवसात बाळंतिणींना गरम पाणी उपलब्ध करून दिले जाते. औषध उपलब्ध करून दिले जातात. प्रसूतीसाठी घरापासून रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिका सोडून देते. सुटी झाल्यावर रुग्णालयातून घरी परतण्यासाठी जननी शिशू सुरक्षा योजनेंतर्गत रुग्णवाहिका मोफत दिली जाते.
..............
कोट
गंगाबाई स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाले तेव्हापासून आतापर्यंत चांगल्या सेवा मिळाल्या. पहिल्या खेपेच्यावेळी जेवढ्या सुविधा नव्हत्या त्यापेक्षा कितीतरी सुविधा आता मिळाल्या. दररोज बेडशिट बदलण्यात आली. स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिसले.
-वर्षा जमरे, बाळंतीण महिला
..........
कोट
गंगाबाई स्त्री रुग्णालयात आधीपासून आता चांगली सुविधा मिळत आहे. नात्यातील अनेक महिलांना या रुग्णालयात प्रसूतीसाठी आणले. त्यावेळी बरोबर सोयी मिळत नव्हत्या. परंतु आता योग्य सुविधा मिळत आहेत. आमच्या रुग्णाला काहीच त्रास झाला नाही.
सुरेश बहेकार, रुग्णाचा नतेवाईक.
........
उपलब्ध खाटा दाखल महिला
बाळंतपणासाठी आल्यानंतर - ४०- ६२
बाळंतपणानंतर सीझरसाठी खाटा- ४०- ३८
बाळंतपणानंतर नॉर्मलसाठी खाटा- ५५- ५०