महिनाभरात बदलणार गंगाबाईचा चेहरामोहरा
By admin | Published: June 25, 2016 01:35 AM2016-06-25T01:35:02+5:302016-06-25T01:35:02+5:30
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाला २०० खाटांचा दर्जा आहे. मात्र त्या तुलनेत गंगाबाईला असलेली जागा अपुरी आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : विविध प्रकारची १८ कामे सुरू
गोंदिया : बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाला २०० खाटांचा दर्जा आहे. मात्र त्या तुलनेत गंगाबाईला असलेली जागा अपुरी आहे. त्या अपुऱ्या जागेतील अर्धी जागा मेडिकल कॉलेजच्या वापरासाठी देण्यात आल्यामुळे वाढलेल्या रूग्णांना त्या ठिकाणी सेवा देण्यास गंगाबाईचे प्रशासन तत्परता दाखवीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाकडे विशेष लक्ष घालून मागच्या वर्षी या रूग्णालयाला ५६ लाख दिले तर यंदा ५० लाख मंजूर केले आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाला २०० खाटांचा दर्जा मिळाला. परंतु २०० खाटा ठेवण्यासाठी गंगाबाई स्त्री रूग्णालयात जागा उपलब्ध नाही. त्यातली एक इमारती मेडीकल कॉलेज करीता देण्यात आल्याने आणखीनच अडचण निर्माण झाली आहे. गंगाबाईतील रूग्णांना चांगली सेवा देण्यासाठी येथील प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध कामासाठी निधी मागण्यात आला. ग्रामीण जनतेला आरोग्याचे चांगली सेवा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मागच्या वर्षी ५६ लाख रूपये दिले, तर यावर्षी ५० लाख देण्याचे मान्य केले. या निधीतून बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात स्टोअर रूम, अपंगासाठी शौचालय बांधकाम करण्यात येत आहे.
हायटेंशन लाईनसाठी पॅनल झोनल तयार होत आहे. सुरक्षा भिंत नवीन तयार करण्यात येत आहे. सुलभ शौचालय दुरूस्त करण्यात आले. पीवर ब्लॉक टाकून गंगाबाई घाणमुक्त करण्याची योजना आखली आहे. अधिक्षक व निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष तयार करण्यात येणार आहे. अपुऱ्या जागेत रूग्णांच्या नातेवाईकांचे तसेच खासगी वाहन आतपर्यंत जाते. त्या वाहनांना प्रवेश बंद करण्यासाठी मोठा गट तयार करण्यात आला आहे. रूग्णांच्या सोयीसाठी सेंट्रल जेल मधून २५ कुलर मागविण्यात आले आहेत. बांधकाम संपताच नालीचे बांधकाम करण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात बाई गंगाबाईचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजीव दोडके यांनी सांगितले.
एक्स्प्रेस फिडरच्याही तक्रारी
एक कोटी रूपयातून बाई गंगाबाई व केटीएस रूग्णालयासाठी एक्सप्रेस फिडर बसविण्यात आले. परंतु रूग्णालयांमध्ये उपकरणे जास्त असल्यामुळे कधी-कधी विद्युतचा त्रास होतो. यासंदर्भात विद्युत वितरण कंपनीला तक्रार केल्यावर वेळीच तक्रारीचा निपटारा होतो. मात्र अनेकदा लाईट जाते. याला गोंदिया शहरात ठिकठिकाणी खडञडे खोदकाम केले जात असल्यामुळे केबल कटल्यास लाईट जाते. एक्स्प्रेस फिडर असूनही कधी कधी लाईट जाते याच्या तक्रारीही बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाकडून करण्यात आल्या आहेत.