एलसीबीने पकडली घरफोडी करणारी टोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:55 AM2018-10-10T00:55:37+5:302018-10-10T00:56:17+5:30

शहरातील घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ आॅक्टोबर रोजी पकडली. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली. या आरोपीकडून ८ लाख २० हजार रूपये किंमतीचे ३२.५ तोळे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी मंगळवारी (दि.९) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Gangs caught by LCB detainees | एलसीबीने पकडली घरफोडी करणारी टोळी

एलसीबीने पकडली घरफोडी करणारी टोळी

Next
ठळक मुद्देनऊ गुन्हे उघडकीस : ३२.५ तोळे सोने जप्त, आरोपी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ आॅक्टोबर रोजी पकडली. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली. या आरोपीकडून ८ लाख २० हजार रूपये किंमतीचे ३२.५ तोळे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी मंगळवारी (दि.९) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
रोहन अविनाश नागज्योती (१९) रा. यादव चौक गोंदिया, बबन सुरेश भागडकर (२०) रा. मरारटोली रेल्वे फाटकजवळ गोंदिया, मनिष विजय राय (२५) रा. सतनामी मोहल्ला सरकारी तलावजवळ गोंदिया व समशेर अन्सार मलीक (४१) रा.श्रीनगर गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सदर आरोपींनी गोंदिया शहर, रामनगर व गोंदिया ग्रामीण या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १३ ते १४ घरफोड्या केल्याची कबुली सदर आरोपींनी दिली. पोलिसांकडे ९ प्रकरणे दाखल असल्यामुळे त्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. २२ ते २३ आॅगस्ट २०१८ च्या रात्री रेलटोलीच्या बापट लॉन रस्त्यावरील निखिल रूपारेल यांच्या घरून या आरोपींनी ८ लाख २० हजार रूपये किंमतीचे ३२.५ तोळ्याचे दागिणे चोरून नेले होते. यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे आले होते. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले. स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचे १८ गुन्हे, मोटारसायकल चोरीचे ११ गुन्हे, चोरीचे ९ गुन्हे असे ३८ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. चोरीचे दागिणे विक्री करण्यासाठी आलेल्यांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी. आणि जो व्यक्ती चोरीचे दागिणे घेईल त्यांच्याविरूध्द कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक बैजल यांनी सांगितले.
३० हजाराचा पुरस्कार
सदर कारवाई केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेला पोलीस अधीक्षकांनी १५-१५ हजाराचे दोन असे ३० हजाराचे पुरस्कार जाहीर केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, प्रमोद बघेले, कर्मचारी विनय शेंडे, तुलसीदास लुटे, सुखदेव राऊत, गोपाल कापगते, भूवनलाल देशमुख, मधुकर कृपाण, विजय रहांगडाले, रेखलाल गौतम, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, अजय रहांगडाले, राजेश बढे, भुमेश्वर जगनाडे, भागवत दसरीया, चंद्रकांत कर्पे, सुजाता गेडाम, पंकज खरबडे, गौतम यांचा समावेश आहे.

Web Title: Gangs caught by LCB detainees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.