गरिबाचा मुलगा ‘कलेक्टर’ बनू शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 09:04 PM2018-01-21T21:04:18+5:302018-01-21T21:04:40+5:30
बच्चे मन के सच्चे होते है. कोशिश करने वालो की हार नही होती. विद्यार्थ्यांनी स्वप्ने मोठी बघावी. हिमालय चढण्याची जिद्द मनात धरायला हवी. आयएएस होण्यासाठी परीक्षा ही मराठीतून सुद्धा देता येते. एका गरिबाचा मुलगाही कलेक्टर बनू शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : बच्चे मन के सच्चे होते है. कोशिश करने वालो की हार नही होती. विद्यार्थ्यांनी स्वप्ने मोठी बघावी. हिमालय चढण्याची जिद्द मनात धरायला हवी. आयएएस होण्यासाठी परीक्षा ही मराठीतून सुद्धा देता येते. एका गरिबाचा मुलगाही कलेक्टर बनू शकतो. त्यासाठी सरावात सातत्य व मेहनत करण्याची जिद्द त्यात असावी. आपण गरीब आहोत, याचा आपणास अभिमान असला पाहिजे, असे मार्गदर्शन मिशन आयएएसचे संचालक डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले.
वडेगाव येथील भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजीत मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी सरपंच तुमेश्वरी बघेले होत्या. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डॉ. नरेशचंद्र काठोळे, डॉ. पत्रे, प्राचार्य ए.डी. पटले, अध्यापक डी.आर. गिरीपुंजे, नागेश बळगे उपस्थित होते.
डॉ. काठोळे पुढे म्हणाले, आतापासून कलेक्टर बनण्यासाठी नियोजन करुन अभ्यास करावा. दरमहा शंभर, वर्षभरात बाराशे प्रश्नांचे उत्तर पाठांतर केल्यास दहा वर्षांत एक लाख २० हजार प्रश्नांचे उत्तर पाठांतर होतील.
दररोज वर्तमानपत्र वाचून त्यातील ए ते झेड पर्यंत प्रश्नांची वर्गवारी करुन अभ्यास करावा. मिशन आयएएस फिस फक्त एक रुपया ठेवण्यात आलेला आहे. अमरावती येथे दरवर्षी १० मे ते १६ मे दरम्यान शिबिराचे आयोजन केले आहे. त्यात तुम्ही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी सरपंच बघेले यांनी सांगितले, ‘आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा.’ शिक्षणासाठी घराचे बंधन तोडून बाहेर जा. उच्च शिक्षण घ्या व मोठे बणून दाखवा असे सांगत त्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. प्राचार्य ए.डी. पटले यांनी स्पर्धा परीक्षेबाबत इंग्रजी विषयाचे महत्व सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन डी.एस. बोदेले यांनी केले. आभार जी.एन. बिसेन यांनी मानले. कार्यक्रमासाठी यु.एफ. टेंभरे, बी.यू. बिसेन, आर.बी. भांडारकर, विनोद धावडे, अरविंद टेंभेकर, संगीता वालदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.