७१ लाभार्थ्यांना गॅसचे वाटप
By admin | Published: June 25, 2017 12:55 AM2017-06-25T00:55:39+5:302017-06-25T00:55:39+5:30
ग्राम परिस्थितीकी विकास समितीतर्फे कोटजांभोरा येथील ७१ लाभार्थ्यांना एलपीजी गॅसचे वितरण नुकतेच करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : ग्राम परिस्थितीकी विकास समितीतर्फे कोटजांभोरा येथील ७१ लाभार्थ्यांना एलपीजी गॅसचे वितरण नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक वनसंरक्षक प्रदीप पाटील, बोंडेचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश चोपडे, सरपंच लूतन भालकाळे, वनक्षेत्र सहायक प्यारेलाल उसेंडी, वनरक्षक अमित शहारे, ईडीसीचे अध्यक्ष लखनलाल दूधकवर, तेजराम पाटील आदी उपस्थित होते. ग्राम परिस्थितीकी विकास समितीच्या माध्यमातून गावातील सर्वच कुटुंबाना गॅस देण्याची योजना शासनाची आहे. योजनेमुळे महिलांना धुराचा त्रास होणार नाही, जंगलाच्या अवैध कटाईला आळा बसेल, गॅसमुळे महिलांना कमी वेळात स्वयंपाक करुन पतीच्या व्यवसायाला हातभार लावता येईल. यामुळे वेळेची बचत झाल्याशिवाय राहणार नाही, असे दुधनाग यांनी मांडले. क्षेत्र सहायक उसेंडी, वनरक्षक शहारे यांनी वनाविषयी सविस्तर माहिती पटवून दिली. एल.पी.जी. गॅस कनेक्शन ७५ टक्के अनुदान शासनाकडून व २५ टक्के लाभार्थ्यांकडून घेण्यात आले. संचालन करून आभार अमित शहारे यांनी मानले.