विविध संस्कारासह गायत्री महायज्ञाची सांगता
By admin | Published: June 16, 2017 01:11 AM2017-06-16T01:11:52+5:302017-06-16T01:11:52+5:30
अखिल विश्व गायत्री परिवार युगतीर्थ शांतीकुंज हरिद्वार आणि गायत्री शक्तीपीठ आमगावखुर्द (सालेकसा) यांच्या
कलशयात्रा व नगरभ्रमण : विविध संस्कार कार्यक्रमासह दीक्षा महोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : अखिल विश्व गायत्री परिवार युगतीर्थ शांतीकुंज हरिद्वार आणि गायत्री शक्तीपीठ आमगावखुर्द (सालेकसा) यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्हा गायत्री परिवाराच्या मार्गदर्शनात येथील गायत्री मंदिरात लोकजागरण जनसंमेलन आणि २४ कुंडीय गायत्री महायज्ञ तसेच प्राणप्रविष्ठा व प्रज्ञा पुराण कथा समारोह विविध संस्कार कार्यक्रमांसह सतत पाच दिवस उत्साहपूर्ण वातावरणात चालले. धार्मिक वातावरणात सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सतत गायत्री मंत्र जापच्या नादात सुरु झालेल्या या महायज्ञाची सुरुवात कलशयात्रा व नगर भ्रमणाने झाली व पहिल्या दिवशी संगीतमय प्रवचन आणि प्रज्ञा पुराण कथा घेण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी वेदमाता गायत्री प्राणप्रतिष्ठा सामूहिक जप ध्यान, प्रज्ञा योग व व्यायाम, गायत्री महायज्ञ आणि पूर्वपूजन, महिला संमेलन आणि युगसाहित्य केंद्राचे शुभारंभ करण्यात आले.
तिसऱ्या दिवशी सामूहिक जप, ध्यान, प्रज्ञा योग, गायत्री महायज्ञ आणि संस्कार अनुयाज कार्यक्रम व कार्यकर्ता गोष्टी कार्यक्रम घेण्यात आल्या. चौथ्या दिवशी सामूहिक जप, ध्यान प्रज्ञा योगाने सुरु झालेल्या कार्यक्रमानंतर गायत्री महायज्ञ संस्कार आणि युवा संमेलन कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी संकल्प दीप महायज्ञ कार्यक्रम घेण्यात आला. शेवटच्या दिवशी गायत्री महायज्ञासह विविध संस्कार, पूर्णाहुती व टोली विदाई कार्यक्रमासह गायत्री महायज्ञ पार पडले.
संस्कार कार्यक्रमामध्ये पुसंवन यात मुंडन तीन, विद्यारंभ ३२, अन्न प्राशन, दीक्षा २० आणि वाढदिवस कार्यक्रम सहा लोकांचे करण्यात आले. याप्रसंगी गायत्री शक्तीपीठाच्या विस्तारित सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान युग निर्माण योजनेच्या सात आंदोलनावर भर देत मार्गदर्शन करण्यात आले. यात साधना, स्वास्थ, शिक्षण, स्वावलंबन, पर्यावरण सरंक्षण, नारी जागरण आणि व्यसनमुक्तीवर विशेष भर देण्यात आले. याप्रसंगी नेमा योगेश कोरे आणि सीमा गोरेलाल कटरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कन्या कौशल्य शिबिरात प्रशिक्षण घेणाऱ्या १० मुलींचासुध्दा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात शांतीकुंज हरिद्वार येथून अशोक खंडागडे, विशाल बंदेवार, सरोज पांडेय, यशवंत उईके, दिनेश मारबते यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमासाठी धनराज कोरे, बालकृष्ण मोटघरे, वासुदेव फुंडे, खुशाल ब्राम्हणकर, धनलाल रहांगडाले, जवाहरलाल उजवणे, ताराचंद नागपुरे, शंकर कावडे, गुुलाब लिल्हारे, महेंद्र मोटघरे, आशा फुडे, रिता दोनोडे, चंद्रकांता लिल्हारे, लीला ब्राम्हणकर, किरण मोरे, केसर बारसे, सूरज उपराडे, विनोद जैन, पराग फुंडे, तसेच परसराम पटले, वेदवती पटले, विपीन बैस, गोविंद येळे, सुनील गजभिये यांचे मार्गदर्शन लाभले.