नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:49 PM2018-07-17T23:49:49+5:302018-07-17T23:50:21+5:30
नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१८) आयोजित करण्यात आली आहे. मे २०१७ मध्ये झालेल्या सभेनंतर ही दुसरी सर्वसाधारण सभा होत असल्याने सर्वांच्या नजरा या सभेकडे लागल्या आहेत. २५ विषयांवर ही सभा होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१८) आयोजित करण्यात आली आहे. मे २०१७ मध्ये झालेल्या सभेनंतर ही दुसरी सर्वसाधारण सभा होत असल्याने सर्वांच्या नजरा या सभेकडे लागल्या आहेत. २५ विषयांवर ही सभा होत आहे.
नवीन अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०१७ मध्ये सुरू झाला. त्यानंतर मे २०१७ मध्ये नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. दरम्यान सुमारे १७ महिन्यांच्या काळात एकही सर्वसाधारण सभा झालेली नाही. यावर एका नगर परिषद सदस्यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाºयांनी नगर परिषद मुख्याधिकाºयांना जाब विचारला होता. यामुळेच ही सभा बोलविल्याचे बोलले जाते. सभेसाठी २५ विषयांच सूची तयार करण्यात आली आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा खरेदी करणे, अग्निशमन बळकटीकरणाचा आराखडा तयार करणे, सरकारी तलावाचे सौंदर्यीकरण हेच विषय महत्वाचे आहेत. तर कित्येक विषयांवर कारवाई करण्यात आली असून आता सभेत फक्त मंजुरीसाठी त्यांना ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे.