वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:27 PM2017-09-29T23:27:23+5:302017-09-29T23:27:35+5:30

एकीकडे शेतकºयांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

 The general public suffered due to rising inflation | वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : शहर युवक काँग्रेसचा महागाई विरोधात मोर्र्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एकीकडे शेतकºयांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अशात वाढत्या महागाई आणि सरकारच्या व्यापारीविरोधी धोरणांमुळे आता व्यापारी आणि सर्वसामान्य जनता देखील त्रस्त आहे. यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे. शहर युवक काँग्रेसतर्फे मोर्चा काढून याचा निषेध नोंदविण्यात आला.
शहर युवक काँग्रेसच्यावतीने गुरूवारी (दि.२८) बैलगाडी मोर्चा काढून विरोध नोंदविण्यात आला. त्यानंतर शहीद भोला कॉंग्रेस भवन येथे सभा घेण्यात आली. शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष नफीस सिद्धीकी यांच्या नेतृत्वात शहीद भोला कॉंग्रेस भवन येथून हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील मुख्य मार्गाने निघालेला हा मोर्चा शहीद भोला कॉंग्रेस भवन येथे पोहचला त्यानंतर त्याचे सभेत रुपातंर झाले.
या वेळी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी, जगात सर्वात जास्त दराने पेट्रोल व डिजेल भारतात मिळते. त्यातही शेजारच्या छत्तीसगड राज्यापेक्षा १० रूपये जास्त दराने आपल्या राज्यात पेट्रोल मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचे काही वरिष्ठ नेते उघडपणे सरकारच्या धोरणांची टीका करीत आहेत. त्यात आता जीएसटी सारखे कठोर नियम लागू करून सरकार व्यापाºयांच्या जखमांवर मिठ चोळण्याचे काम करीत आहे. नोटबंदी व जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापाºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यातून बाहेर पडायला आता कित्येक वर्षे लागतील असे मत व्यक्त केले. याप्रसंगी कॉंग्र्रेस कमिटी शहर अध्यक्ष अशोक चौधरी, गोंदिया -भंडारा युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, नगर परिषद पक्ष नेता शकील मंसूरी, नगरसेवक सुनील भालेराव, भागवत मेश्राम, अपूर्व अग्रवाल, सुशील रहांगडाले, देवा रूसे, संदीप रहांगडाले, आलोक मोहंती, राजू लिमये, मनोज पटनायक, अफजल शेख, बलजीतसिंह बग्गा, जुबेर खान, संतोष डोंगरे, प्रशांत उके, बिट्टू खान, सन्नी पटवा, आशिष चौरे, विजय पटले, यासीन शेख, शहजाद खान, खलील पठाण, नितीन बघेले, निक्की बघेले, आदीत्य चव्हाण, आकाश ठाकूर, बब्बी खतवार, आशिष मेंढे, मोंटी खान, अप्पू कोरे, सुरेश यादव, कैलाश यादव, मोनू खान, रितेश वंजारी, किशन भगत, प्रवीण पटवा, प्रशांत डोंगरे, अवी कोसरकर, जीतू क्षीरसागर, राजेश शिवणकर, गुड्डू बिसेन, सुरेश पटले यांच्या सह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यक र्ते उपस्थित होते.

Web Title:  The general public suffered due to rising inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.