मारेकºयांना त्वरित अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:43 PM2017-09-09T23:43:38+5:302017-09-09T23:43:54+5:30

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करीत त्यांच्या मारेकºयांना त्वरित अटक करण्याची मागणी येथील सामाजिक संस्थांनी केली आहे. तसेच यासंबंधीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे.

Get arrested immediately | मारेकºयांना त्वरित अटक करा

मारेकºयांना त्वरित अटक करा

Next
ठळक मुद्देगौरी लंकेश हत्या प्रकरण : सामाजिक संस्थांचे राष्ट्रपतींना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करीत त्यांच्या मारेकºयांना त्वरित अटक करण्याची मागणी येथील सामाजिक संस्थांनी केली आहे. तसेच यासंबंधीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे.
गौरी लंकेश या वरिष्ठ पत्रकार व स्तंभ लेखिका होत्या. लंकेश फासीस्ट, धर्मांध राजकारण व अन्यायपूर्ण जाती व लिंगभेद व्यवस्थेच्या विरोध आपल्या लेखनातून करीत होत्या. शिवाय धारवाड येथील खासदारांच्या विरोधात लिखान करीत असल्याने त्यांना सतत धमक्या मिळत होत्या. विशेष म्हणजे ५ सप्टेंबर रोजी डॉ. दाभोळकर, पानसरे व डॉ. कुलबर्गी यांच्याप्रकारेच लंकेश यांची हत्या करण्यात आली. लोकतंत्राच्या चौथ्या स्तंभावर हल्ला करण्यात आल्याने याचा विविध संस्थांनी निषेध व्यक्त केला.
तसेच लंकेश यांच्या मारेकºयांना त्वरित अटक करण्यात यावी यासाठी नायब तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना सामाजीक संस्थांकडून संयुक्त निवेदन पाठविण्यात आले. याप्रसंगी सिपीआई अध्यक्ष मिलींद गणवीर, समता संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश बंसोड, समाज परिवर्तन संघाचे अध्यक्ष यशपाल डोंगरे, रिबप्लीकनचे अध्यक्ष अमित भालेराव, सामाजीक कार्यकर्ता विलास राऊत, नगरसेवक देवा रूसे, मुस्लीम संघटनेचे प्रतिनिधी मोहसीन खान, बुद्धीस्ट समाजाचे जिल्हा प्रतिनिधी दिपेंद्र वासनीक, हौसलाल रहांगडाले, श्याम चौरे, सुरेंद्र खोब्रागडे, निलेश देशभ्रतार, माणिक गेडाम, सुशील ठवरे, राजू राहूलकर, एस.डी.महाजन, करूणा गणवीर, मधू लांजेवार, रामचंद्र पाटील, परेश दुरूगवार, विनोद मेश्राम, प्रल्हाद उके, प्रशांत डोंगरे, शिव गणवीर यांच्यासह अन्य संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Get arrested immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.